0

आठ-आठ महिने मीटर रिंडीग न घेताच बिले?
अनेक ग्राहकांना अव्वाच्या सव्वा बिले?
बिल दुरूस्तीला गेलेल्या ग्राहक व कर्मचार्‍यात तू-तू मैं-मैं
  लक्ष्मीदहिवडी / दत्तात्रय नवत्रे
      मंगळवेढा तालुक्यातील वीज ग्राहकांना वीज वितरणच्या गहाळ कारभाराचा मनस्ताप होत असून अनेक ग्राहकांच्या तक्रारी होऊनही हा विभाग सुधारणेचे नावच घेत नाही. अनेक ग्राहकांना चुकीची बिले आकारणे, मीटर युनिट न पाहताच वाढवून बिल देणे, रिंडीग न घेताच अंदाजे बिल तयार करणे, नवीन वीज मागणी करूनही त्वरित वीज जोडणी न देणे वीज चोरीकडे पूर्ण दुर्लक्ष करणे, अशा अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष होत असल्याने ग्राहकांमधून महावितरणच्या कारभाराचा निषेध होत आहे.सहाय्यक अभियंता हेमंत ताकपेरेंच्या बदलीनंतर यांनी पदभार स्वीकारला. त्यांच्याकडून अनेक ग्राहकांकडून पारदश्री कारभाराची अपेक्ष होती. परंतु, त्यांच्या काळातही असे प्रकार सुरूच आहेत. उलट अर्ज देणार्‍या व्यक्तीस टोलवाटोलवीची उत्तरे देऊन कार्यालयातून पिटाळून लावण्याचा प्रय▪होत आहे.सध्या सहाय्यक अभियंता कोळेकर यांचेसमोर महावितरणच्या भ्रष्ट कारभाराला लगाम घालून कार्यालयातील आडदांड कर्मचार्‍यांना वेसण घालून शिस्त लावण्याचे मोठे आव्हान आहे. अनेक कर्मचारी हे तक्रारी घेऊन गेलेल्या ग्राहकांना अरेरावीची भाषा वापरतात. तासन्तास ग्राहकांना ताटकळत उभे रहावे लागत असते तर काहीजण बिल विभागातील संगणकावर ऑनलाईन पत्ते खेळण्यात मग्न असल्याचे अनेक ग्राहकांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे अशा कर्मचार्‍यांना शिस्त लावून तक्रार घेऊन गेलेल्या ग्राहकांचे समाधान करून परत पाठविणे गरजेचे आहे. अनेक ग्राहक तालुक्यात आहेत की वाढीव बिलामुळे त्रस्त आहेत. असा अनागोंदी कारभार नूतन सहाय्यक अभियंता कोळेकर थांबवून पारदश्री कारभार अंमलात आणतील का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.     

Post a Comment

 
Top