0
उदयपूर – रविवारी सकाळी डबोक येथील महाराणा प्रताप विमानतळावर एक धमकीचा फोन आला आणि सुरक्षा यंत्रणा कामाला लागली. ‘बापूंना १५ दिवसांमध्ये सोडले नाहीतर भारतात एकही विमान उडू देणार नाही अशी धमकी फोन करणार्‍याने दिली असून विमानतळाच्या सुरक्षेत या फोननंतर वाढ करण्यात आली आहे.
डबोक पोलिस स्टेशनमध्ये विमानतळ प्राधिकरणाचे विशेष कार्यकारी अधिकारी विनय दाहिमा यांनी धमकीच्या फोनची तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधिकारी रेवंत दान यांनी सांगितले, की विमानतळाच्या एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) ऑफिसमध्ये लँडलाइनवर मोबाईलवरुन धमकीचा फोन आला होता.
अज्ञात व्यक्तीने तो रायबरेलीचा असल्याचे सांगितले होते. एटीसी ऑफिसमध्ये असिस्टंट मॅनेजर सरोज मीणा यांनी फोन रिसिव्ह केला होता. त्यांनी धमकीची माहिती तत्काळ विनय दाहिमा यांना दिली. पोलिसांनी धमकीच्या फोनचा तत्काळ तपास सुरु केला आणि ज्या मोबाईलवरुन फोन आला होता तो रायबरेलीतील लालगंज येथील राणी खेड्यातून आल्याचे सांगितले आहे. रायबरेलीच्या धर्मेंद्र कुमार याच्या नावावर ते सिम आहे. उदयपूर पोलिस उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने आरोपीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे.

Post a Comment

 
Top