0

मुंबई : विधानसभेच्या नवनिर्वाचित 288 आमदारांपैकी तब्बल 165 जणांवर विविध गुन्हे दाखल असल्याची धक्कादायक माहिती समोर आहे. यामधील 115 आमदारांवर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, दरोडा तसंच अपहणासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. ‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स’ या संस्थेच्या अहवालात ही माहिती उघड झाली आहे.   भाजपाच्या 122पैकी 46 आमदारांवर विविध गुन्ह्यांची नोंद आहे. तर शिवसेनेच्या 63 पैकी 35 आमदारांवर गुन्हे दाखल आहेत. टक्केवारीच्या तुलनेत शिवसेनेमध्ये सर्वाधिक 56 टक्के आमदारांवर गुन्हे दाखल आहेत. राष्ट्रवादीचे 44 टक्के तर काँग्रेसच्या 24 टक्के आमदारांवर गुन्हे दाखल आहेत.   'असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स' या संस्थेने नवनिर्वाचित 288 आमदारांच्या आर्थिक, शैक्षणिक आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीचा अभ्यास करुन हा अहवाल सादर केला.

Post a Comment

 
Top