0

निवडणुकीनंतर राज ठाकरे पुन्हा अॅक्टिव,राज्यपालांना ऊस दराबाबात लिहिलेलं पत्र
मुंबई : विधानसभेत सपाटून मार खाल्ल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना शेतकऱ्यांची आठवण आली आहे. टोल आंदोलनासाठी प्रसिद्ध असलेल्या राज ठाकरे यांनी चक्क ऊस दरासाठी पुढाकार घेतला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पहिला हप्ता 2500 रुपये, तर अंतिम हप्ता तीन हजार रुपये द्यावा, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे. त्याबाबत त्यांनी राज्यपालांना निवेदन दिलं आहे. 

काय आहे निवेदन?

 राज ठाकरे यांनी ऊस दराबाबत राज्यपाल सी.एच. विद्यासागर राव यांना निवेदन दिलं आहे. या निवेदनात, “ महाराष्ट्रातील सर्व साखर कारखाने सुरु झाले आहेत. मात्र ऊसाचा पहिला हप्ता आणि अंतिम दर अद्याप जाहीर झालेला नाही. कारखाने झपाट्याने ऊस तोडून नेत आहेत. त्यामुळे शेतकरी कोंडीत सापडला आहे. बी-बियाणे, खते यांचे वाढते दर पाहाता ऊसाला पहिली उचल 2500 रुपये तर अंतिम दर तीन हजार रुपये द्यावा. यासाठी राज्यपालांनी स्वत: लक्ष घालून दर जाहीर करावेत” असं म्हटलं आहे.

Post a Comment

 
Top