0

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार भारत भालके यांना पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातील जनतेने पुन्हा एकदा संधी देत त्यांच्यावर विश्‍वास दाखविला आहे. त्यांच्याकडून मतदार संघातील जनतेच्या खूप अपेक्षा आहेत. गतवेळी ते राज्यातील सत्ताधारी पक्षाबरोबर होते. यावेळी त्यांना विरोधात बसून विकासकामे करावी लागणार आहेत. शहरातील विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी आ. भालके यांना विरोधांना विश्‍वासात घेऊन काम करावे लागणार असून, त्यांना कसा प्रकारचा प्रतिसाद मिळतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, शह कटशह याचा परिणाम शहर विकासावर तर होणार नाही ना असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. राज्यातील एक तिर्थक्षेत्र म्हणून आघाडी शासनाने पंढरपूर शहराच्या विकासासाठी विशेष निधी उपलब्ध करून दिला. त्यातून शहरातील रस्ते, पूल, विद्युत पुरवठा तसेच स्वच्छतेची कामे सध्या सुरू आहेत. काही कामे प्रलंबित आहेत ती लवकरात लवकर मार्गी लागावीत यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रय▪सुरू आहेत. हे होत असताना स्थानिक नागरिकांच्या मुलभूत समस्या मार्गी लागणे आवश्यक आहे. शहरातील पाणीपुरवठा योजना, भुयारी गटार योजना यांची कामे पुर्णत्त्वाकडे आली आहेत. अंतर्गत रस्ते तसेच स्वच्छतेचा प्रश्न अजूनही 'जैसे थे' आहे. आ. भारत भालके यांना हे स्थानिक प्रश्न सोडविण्यासाठी अधिक प्रय▪करावा लागणार आहे. त्याला सत्ताधारी गटाची कश्ी साथ मिळते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दुसरीकडे जिल्हा दूध संघाचे चेअरमन प्रशांत परिचारक यांनी विधानसभा निवडणुकीत आपला पराभव झालेला असला तरी, कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये. राज्यात महायुतीचे सरकार येणार असून त्या माध्यमातून आपण शहर विकासासाठी प्रय▪करणार असल्याचे म्हटले आहे. नगरपालिका तसेच पंचायत समिती परिचारक गटाकडे आहे. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस निवड झाल्यानंतर, त्यांच्याकडून शहर विकासासाठी प्रय▪होतील अशा अपेक्षा व्यक्त करण्यात येऊ लागल्या आहेत. महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ त्यांनी पंढरपूर येथून केला होता. 'स्वाभिमानी'चे उमेदवार प्रशांत परिचारक यांना पराभव पत्करावा लागला असला तरी, परिचारक हे भाजप तसेच फडणवीस यांच्याशी जवळीक साधीत शहर विकासासाठी नव्या योजना खेचून आणू शकतात. त्यासाठी सर्वांना एकत्र येणे आवश्यकआहे. यंदाच्या निवडणूकीत आपण कुठे कमी पडलो याचे आत्मचिंतन करीत, भविष्यात शहर विकासासाठी परिचारक सक्रीय राहिल्यास त्याचा फायदा त्यांना पुढच्या निवडणूकीत मिळू शकतो. हे होत असताना ते ज्या पक्षाकडून उमेदवारी मिळाल्या पक्षात राहणार की भाजपाची वाट धरणार हे पुढच्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होणार आहे. गेल्या काही वर्षात राज्य शासनाच्या तिर्थक्षेत्र विकास आराखड्यातून शहरात कामे सुरू असली, शहरातील इतर जे प्रश्न आहेत ते अद्याप प्रलंबित आहेत. शहरातील अनेक समस्या अद्याप मार्गी लागलेली नाहीत. निवडणुकीआधी काही दिवस नागरिकांमध्ये जे वातावरण होते त्याचा फारसा नकारात्मक परिणाम आ. भालके यांच्या मताधिक्यावर झालेला नसला तरी ही त्यांच्यासाठी धोक्याची घंटा असून, पुढच्या पाच वर्षांसाठी आमदार भारत भालके यांना त्यासाठी अधिक वेगाने काम करावे लागणार आहे.

Post a Comment

 
Top