0

मेडिकल कॉलेजमधला फस्र्ट ईयर ते लास्ट ईयर हा प्रवास भावनिक पातळीवर एवढे बदलत घडवून आणणारा असेल, असं खरचं वाटलं नव्हतं. एखादा मेडिको जेव्हा काहीतरी लिहितो अथवा जेव्हा त्याच्याबददल काहीतरी लिहिलं जातं, तेव्हा फस्र्ट ईयरच्या रॅगिंगपासून ते पहिलंच कॅडॅव्हर डिसेक्शन, पहिलीचं सर्जची, पहिल्यांदा पाहिलेले पोस्टमार्टम, प्रत्येक हॉस्टलाईटची कहाणी, तो किंवा ती आवडली तेव्हा, फिरोदिया पुरुषोत्तमच्या आठवणी अशा अनेक विषयांमधून एका मेडिकोचं भावविश्‍व दाखविण्याचा नेहमीच प्रय▪केला जात असतो. पण खर्‍या अर्थाने, एखाद्या मेडिकोमध्ये होणरा भावनिक बदल हाय असतो हे मी त्यादिवशी अनुभवलं. गेल्याच आठवड्यातील गोष्ट. आम्ही आयसीयुच्या बाहेरून जात असताना एक साधारत: पंचवीशीतील बाई जोरजोरात रडत होती. दु:खाने तडफडत होती. या सगळ्या दृष्यातून तिच खूप जवळचं कोणीतरी तिनं गमावलं असावं, असा अंदाज येत होता. आम्ही सगळे इतक्या सहजतेने, स्वत:च्या त्या सगळ्यांपासून इतक अलिपत ठेवत त्या तिथून पुढे आलोत, जस काही आजुबाजूला जे चालू आहे तो अगदी नॉर्मल सिरियस आहे. का ते माहिती नाही. पण थोडसं अंतर चालून पुढे आल्यावर अचानक मनात एक विचार आला, आपण इतकं कस आणि कधी बदललो ? कारण काहीच वर्षांपूर्वी याचठिकाणी अशच एका दृष्याने मला इतकं हेलावून टाकलं होत की तो आवाज आणि तो आवाजताच उद्रेक पाहून घाबरायला झाल होत. पण आज मात्र मी अगदी तटस्थ होते. नाही मला वाईट वाटलं, नाही मी हळवी झाले! जसं एखादं दृश्य पुन्हा पुन्हा पाहिलं की नजर मेली अस म्हणतात. तसंच सारखा समोर येणारा तोच आवाजांचा उद्रेक पाहून आम्हा डॉक्टरांची भावना तर मरत नसेल ना ? आज फॅमिली डॉक्टर ही कन्सेप्ट धुसट होतीय, त्याच एक कारण हेच तर नसेल? रुग्णांना फक्त सब्जेक्ट समजणे म्हणजे डॉक्टरांनी मनिनिरीश्ी खेळणार्‍या इंजिनिअरींगची पदवी घेतल्यासारखं नाही का ? अर्थात डॉक्टर भावनाशुन्य नको म्हणजे अगदी भावनी होऊन ढसाढसा रडणारा हाव, असं नक्कीच नाही. पण या दोन्हींचा मध्य गाठता येणं ही प्रत्येक मेडिकोसाठीच एक मोठी परिक्षा आहे आणि काळाची गरजही! चिठ्ठीवरून गोळ्या देणार्‍या डॉक्टरपेक्षा तोंडभरून बोलणारा डॉक्टर कधीही जास्तच भाव खाऊन जातो. पेशंटला तुमच्या आक्यूशी खरतच तस फारसं देणंघेण नसतं. त्यामुळे नावाच्या पुढे किती डिग्री आहेत हे पाहून कदाचित पहिल्यांदा पेशंट तुमच्याकडे येईलही पण जर त्याच्या व्यवहारिक गणितामध्ये तुमचा माणुसकीची गोळाबेरीज शुन्य आली तर मात्र पुढय़ावेळीसाठी त्याला तुमच्याकडे वळवणं खूप कठीण असतं आणि म्हणूनच स्वत:मधल्या डॉक्टराला वेळोवेळी अपडेट ठेवण्याबरोबरच स्वत:मधल्या माणसालाही वेळोवेळी जाग करण गरजेचं आहे. त्या आयसीयू समोरचा तो प्रसंग पाहून माझ्या डोळ्यात पाणी यायला हवं होतं, असं मी नक्कीच म्हणत नाही. पण आपल्या आजुबाजूला चालणार्‍या घटनांचे भावनिक पडसादही आपल्या मनावर उमटू नयेत, हे ही चुकीचंच आहे. कारण संवेदनशील असणं हे भावनिकदृष्ट्या जिवंत असण्याच चिन्ह आहे. हे विसरून चालणार नाही. माझ्या स्वत:मधला हा बदल माझ्यासाठी खूप धक्कादायक असला तरीही प्रत्येक मोडिकोला या बदलातून जावच लागतं यात काहीच वाद नाही.

- स्नेहल मिरगणे        

Post a Comment

 
Top