0

कोळा / प्रतिनिधी
सांगोला तालुक्यातील जुनोनी व कोळा परिसरातल्या आठवडा बाजारात तसेच घरोघरी फिरून चहा पावडरचे व्यापारी मोठय़ा प्रमाणात चहा पावडरची विक्रई करत आहेत. या विक्रेत्यांपैकी काही विक्रेते भेसळयुक्त चहा पावडरची विक्री करत असल्याचे लोकांमधून बोलले जात आहे. अनेक फिरते चहा पावडर विक्रेते कोळे, जुनोनी गावतल्या आठवडा बाजारात व घरोगरी जाऊन चहा पावडरची विक्री करतात. यापैकी काही विक्रेत्यांकडे अधिकृत कंपनीचा चहा नसतो. अत्यंत निकृष्ट दर्जाची चहा पावडर होलसेल दरामध्ये खरेदी करुन घरीच ५0 ग्रँम पासुन १ किलोपर्यतचे पॅकींग साध्या प्लास्टीकच्या पिशवित करतात व हा चहा खेडोपाडी घरोघरी जाऊन विक्री करतात. भेसळयुक्त चहा विक्री करणारे विक्रेते चहा पावडरमध्ये भाताचा कोंडा मिसळत असल्याचे ग्राहकांमधुन बोलले जात आहे. तसेच चहा सुगंधी होण्यासाठी रासायनिक पदार्थाचा वापर केला जात असल्याचेही चर्चेत आहे. अन्न व औषध प्रशासनाने याबाबत दखल घेऊन वेळी कारवाई केल्यास यावर आळा बसून नागरिकांचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होईल.      

Post a Comment

 
Top