मंगळवेढा / तालुका प्रतिनिधी
विधानसभा निवडणूकीच्या अंतिम टप्प्यात अनेक दलबदलू कार्यकर्त्यांनी नेहमीप्रमाणे दल बदलले. यामध्ये काही कार्यकर्ते आवताडे यांच्या शिवसेनेकडे गेले तर काही परिचारक गटाकडे तर राहिलेले आ. भालके गटाकडे गेले. परंतु, विजय हा एकाचाच होणार होता. शेवटी आ. भालकेंनी विजयश्री खेचून आणली. यामुळे त्यांच्या गोटातील कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह दिसून येत आहे तर परिचारक व आवताडे गटात नाराजीचे वातावरण. परिचारक गटाकडे जाणार्यांना परिचारक यांचा विजय निश्चित वाटला होता. वातावरण देखील परिचारक यांच्यासारखे होते. परंतू शेवटच्या तीन दिवसात वातावरण कमालीचे बदलले, अडचणीतील आ. भालके सुस्थितीत आले आणि पाहता पाहता आ. भालकेंनी परिचारक यांचा पराभव केला. यामुळे आ. भालकेंकडून परिचारकांकडे गेलेले कार्यकर्ते दुर्दैवी ठरले. तर आ.भालकेंकडे आलेले कार्यकर्ते नशीबवान ठरले. सर्वात शेवटी जावून विजयात सहभागी होण्याचा आनंद त्यांना मिळाला. शिवाय आ. भालके यांच्या जवळ जाण्याची संधी मिळाली. बरोबर अंतिम टप्प्यात थोडे काम करुन विजयाच्या श्रेयात वाटा घेण्याची संधी मिळाली. एकूणात आ. भालके सर्मथक व नवीन आलेले आ. भालके सर्मथक यांना ही दिवाळी चांगलीच आंनददायी ठरली आहे. दरम्यान, आवताडे यांच्याकडे सुरुवातीपासून शेवटपर्यंत कार्यकर्ते ठाम राहिले. परंतू याला शिवसनेचे पदाधिकारी अपवाद ठरले. शिवसेनेकडे असलेल्या शिवसैनिकांनी आपले काम फत्ते केले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment