0

नवी मुंबई

 महाराष्ट्रात वेअर हाऊसमध्ये माल उचलण्याचे काम करणाऱ्या कामगाराला महिन्यापोटी चार लाखाचा पगार मिळतोय हे ऐकल्यावर तुम्ही विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे. नवी मुंबईतील केंद्र सरकारच्या फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या वेअर हाऊसेसमध्ये मालाचं लोडिंग-अनलोडिंगचं काम कऱणाऱ्या हमालांना एफसीआईच्या वेअर हाऊसेसमध्ये काम करणाऱ्या कामगारांना विविध भत्ते, वेतन मिळून पगाराचा आकडा दर माणशी सुमारे 4 लाख रूपये एवढा पगार दिला गेला आहे.

ऑगस्ट 2014 मधील आकडेवारी पाहिली असता एफसीआयच्या गोडाऊन्समध्ये कामाला असणाऱ्या जवळपास 370 हमालांना प्रत्येकी 4 लाख रूपये विविध भत्त्यांच्या माध्यमातून मिळाल्याचं समोर आलं आहे.
 
या भत्त्यांमधे मूळ वेतन, भत्ते, प्रोत्साहनपर रक्कम आणि थकबाकी इत्यादी रकमांचा समावेश आहे. इतर 386 लोकांना मिळणारा पगार साधारण 2 ते 2.50 लाख रूपये एवढा आहे. तर इतर 6000 लोकांना साधारण 50 हजार ते 1 लाख रूपये इतका पगार मिळाला आहे. हमलांद्वारे सतत होणारे संप, धऱणे आंदोलनं आणि एफसीआय़सोबतच्या कंत्राटदारांच्या कठोर करारांमुळे हे भत्ते एवढे वाढल्याचं कळतं आहे.

कर्मचारी कायद्यांविषयी अभ्यासकांच्या सांगण्याप्रमाणे, काही हमालांचं महिन्यांचं उत्पन्न एवढं जास्त आहे की त्यांनी त्यांच्या नावाखाली काही ‘प्रॉक्सी वर्कर्स’ ठेवले आहेत. हे कामगार एका माणसाच्या नावाखाली अनेक माणसांचं काम करतात. ज्यांना ते 7 ते 8 हजार रूपये दरमहा देतात. धक्कादायक बाब म्हणजे ही परिस्थिती गेल्या 15 वर्षांपासून अशीच आहे.
 
2003 पासून गरज वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणावर हमालांची भरती केली गेली, मात्र दुर्दैवानं त्याची कुठलीही नोंद सरकार दरबारी नसल्यानं अशाप्रकारचा अनियमितपणा आल्याचं कळतं आहे.
-------------------------------------

Post a Comment

 
Top