0

वॉशिंग्टन :
एखाद्या व्यक्तीच्या दैनंदिन जीवनशैली व सवयीवरून त्याच्या मृत्यूचे भाकीत वर्तविणारे अनोखे स्मार्टफोन अँप्लिकेशन तयार करण्यात आले असून, याद्वारे संबंधित व्यक्तीच्या मृत्यूची तारीख व वेळ वर्तविली जाणार असल्याचे अँप्लिकेशनच्या निर्मात्यांनी सांगितले. 'डेडलाइन' असे नाव असलेले हे अँप्लिकेशन आयट्युन्सवर विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. 'अँपल'च्या हेल्थकीटमधील स्मार्टफोन वापरकर्त्याच्या आरोग्याच्या माहितीवरून त्याच्या मृत्यूचे भाकीत या अँप्लिकेशनद्वारे वर्तविले जाणार आहे. वापरकर्त्याने त्याचे वय, लिंग, उंची, शरीरयष्टी, वजन, आरोग्याची सद्य:स्थिती, रक्तदाब, दैनंदिन जीवनशैली, व्यायामाचा प्रकार, दररोज केला जाणारा शारीरिक व्यायाम इत्यादी माहिती या अँप्लिकेशनमध्ये टाकल्यानंतर त्याचा मृत्यूचा अंदाज या अँप्लिकेशनद्वारे वर्तविला जाणार आहे. विशिष्ट प्रकारच्या आरोग्य मापदंडावर संबंधित वापरकर्त्याच्या आरोग्याच्या माहितीचे विश्लेषण करून त्याच्या मृत्यूची तारीख हे अँप्लिकेशन दाखवेल व त्याचे किती वर्षांचे आयुष्य उरले आहे, याची उलटगणतीही या अँप्लिकेशनमध्ये सुरू होणार आहे.

Post a Comment

 
Top