0

पंढरपूर / शहर प्रतिनिधी
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी येथील तहसील कार्यालयात दगडफेक करून केबिनची काच फोडल्याप्रकरणी तिघांना १ दिवसाची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. नागेश शांतीनाथ गायकवाड (रा.ओझेवाडी), विजय नंदकुमार वाघ व भास्कर चंद्रकांत जगताप (रा.पंढरपूर) अशी पोलीस कोठडी मिळालेल्या तिघांची नावे आहेत. मराठा आरक्षणाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर विविध संघटनांनी शुक्रवारी (दि.१४) येथे तहसीलदार गजानन गुरव यांना निवेदन दिले. या दरम्यान नायब तहसीलदारांच्या केबिनची काच दगडाने फोडण्यात आली. याप्रकरणी नायब तहसीलदार मारूती मोरे यांनी शहर पोलीस ठाण्यात सदर तिघांविरूध्द फिर्याद दाखल केली होती. पोलिसांनी तिघांनाही अटक करून आज (शनिवार) न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गबाले हे करीत आहेत.

Post a Comment

 
Top