मुंबई : फेसबुकवर चॅटिंग आणि त्यानंतर भेट हे सध्या खूपच सामान्य झालं आहे. इतकंच काय तर चॅटिंगद्वारे फसवणुकीचे प्रकरणंही वाढली आहेत. हे फक्त मुलींच्या बाबतीत होतं असं नाही. एक पुरुष त्याच्या फेसबुक फ्रेण्डला भेटण्यासाठी हॉटेलमध्ये गेला. पाहिलं तर काय ती फ्रेण्ड त्याची बायकोच निघाली आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. कुवेतमध्ये राहणाऱ्या या व्यक्तीला फेसबुकवर फ्रेण्ड रिक्वेस्ट आली. महिलेचं नाव वाचताच रिक्वेस्ट एक्सेप्ट केली. त्यानंतर दोघांमध्ये अनेकदा चॅटिंग झाली. ही चॅटिंग इतकी पुढे गेली की दोघांनी हॉटेलमध्ये भेटण्याचं ठरवलं. यामुळे हा व्यक्ती फारच आनंदी होती. मोठ्या जोशमध्ये तो हॉटेलमध्ये पोहोचला. पण समोर असलेली फेसबुक फ्रेण्ड ही दुसरी-तिसरी कोणी नसून त्याची पत्नी असल्याचा साक्षात्कार झाल्यानंतर त्याच्या आनंदावर विरजण पडलं. खरंतर त्या व्यक्तीच्या पत्नीला संशय होता की, तिच्या पतीची कोणत्या तरी फेसबुक फ्रेण्डसोबत डेटिंग करण्याची इच्छा आहे. त्यामुळे तिने फेसबुकवर फेक अकाऊंट ओपन करुन पतीला फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवली आणि पतीनेही ती एक्सेप्ट केली. हॉटेलमध्ये पत्नीला पाहून त्या व्यक्तीचे हातपाय कापायला लागले. सगळा उत्साह एका क्षणात मावळला. त्यानंतर दोघांमध्ये भांडण झालं आणि प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं. मात्र त्या व्यक्तीच्या फेसबुक फ्रेण्डसोबत डेटिंग करण्याच्या इच्छेमुळे पत्नीने त्याच्यापासून घटस्फोट घेण्याचं ठरवलं आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment