ग्लोबल रेटिंग एजन्सी फिचनुसार टेलिकॉम सेक्टरमध्ये रिलायन्स जियोच्या एन्ट्रीनंतर इंटरनेट डेटा दरांमध्ये २० टक्के कपात होऊ शकते. दरम्यान रेटिंग एजन्सीनुसार यामुळे चार मुख्य ऑपरेटरच्या वित्तीय स्थिती या काळात कोणताही परिणाम होणार नाही. व्हॉइस शुल्क वाढले आणि नियामक वातावरण सुधारल्याने त्यांचा महसूलात वाढ होत आहे. फिचच्या एका रिपोर्टनुसार २०१५मध्ये पहिल्या सहा महिन्यात रिलायन्सच्या जियोची संभावित एन्ट्रीने डेटा सेक्शनमध्ये स्पर्धा वाढणार आहे. यामुळे भारती एअरटेल, व्होडाफोन,
आयडिया आणि आरकॉमच्या डेटा दरात कमीत कमी २० टक्के कपात होण्याची शक्यता आहे. रिलायन्स जियो मुख्यत्वे डेटावर ध्यान केंद्रीत करणार आहे. या खेरीज सध्याच्या ऑपरेटर व्हॉइस कारभारावर याचा कमी प्रभाव पडणार आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment