मंगळवेढा/ समाधान फुगारे
मंगळवेढा तालुका हा महाराष्ट्रभर संतांची भूमी व ज्वारीचे कोठार म्हणून प्रसिद्ध असून, तालुक्याच्या इतिहासात प्रथमच चार साखर कारखाने सुरू झाले आहेत. तालुक्यात स्व.कि.रा.र्मदा व स्व.रतनचंद शहा यांनी २0 वर्षापूर्वी उभा केलेला श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना हा एकमेव सहकारी साखर कारखाना असून यामध्ये फेबटेक शुगर तसेच युटोपीयन शुगर व भैरवनाथ शुगर हे आणखीन तीन खासगी कारखानेही प्रथमच सुरू झाले आहेत. यामध्ये फेबटेक शुगर या कारखान्याचा दुसरा गळीप हंगाम आहे तर युटोपीयन व भैरवनाथ शुगर यांचा प्रथम गळीप हंगाम आहे. यावर्षी दामाजी साखर कारखाना ७ लाख गाळप तर फेबटेक शुगर ९ लाख व भैरवनाथ ८ लाख तर युटोपीयन कारखान्याने ६.५ लाख गाळपाचे धोरण अवलंबले आहे.
सध्या चार कारखान्याकडून लाख हजार ऊस टनाचे गाळप केले आहे. यामध्ये फेबटेक शुगर हा गाळपामध्ये आघाडीवर असून त्यांनी लाख हजार उस टनाचे गाळप केले आहे तर दामाजी सहकरी साखर कारखान्यांनी लाख हजार तर भैरवनाथ शुगर यांनी लाख हजार तर युटोपीयन शुगरने हजार गाळप टन उसाचे सध्यस्थितीला झाले आहे. उसाच्या दराची कोंडी अद्यापही सुटली नसली तरीही जिल्ह्यातील त्या-त्या परिसरातील कारखानदारांच्या धोरणानुसार शेतकर्यांच्या उसाला प्रतीटन दर ठरणार आहे. मंगळवेढा तालुका हा ७0 टक्के दुष्काळी तर ३0 टक्के भाग हा भीमा नदी व उजणी धरणावर अवलंबून आहे. त्यामुळे दुष्काळी तालुका म्हणून मंगळवेढय़ाचे नाव आता या साखर कारखानदारीमुळे पुसण्याच्या मार्गावर आहे. परंतु अद्यापही पाणीप्रश्न पूर्णपणे सुटला नाही. सध्या शेतकर्यांना म्हैसाळच्या पाण्याची प्रतीक्षा आहे. ३५ गावातील पाणी योजनेला मंजुरी मिळाली असली तरीही शेतकर्यांचे या पाणी योजनेसाठी लागणार्या निधीकडे लक्ष लागले आहे. हा तालुका दुष्काळी असला तरीही तालुक्याचे क्षेत्र सांगली जिल्हा व कर्नाटक राज्य हद्दीपर्यंत येत असल्यामुळे कर्नाटक राज्यातील ऊस फेबटेक शुगर, दामाजी शुगर व भैरवनाथ शुगर या कारखान्यांना मिळत आहे. तर युटोपीयन शुगरला मंगळवेढा पंढरपूर तालुक्यातून ऊस येत आहे. भविष्यात दक्षिण भागात शेतीला पाणी मिळाल्यास या चारही कारखान्यांना इतर कोणत्याही तालुक्यावर व परिसरावर अवलंबून राहावे लागणार नाही. तो ऊस मंगळवेढा तालुक्यातच मिळणार आहे. त्यामुळे तालुक्यातील बेरोजगारांना व मजुरांना रोजगाराची संधी या चार कारखान्यांमुळे चांगली मिळाली आहे. त्यामुळे या चारही कारखान्यांना उसाच्या दराबाबत स्पर्धा निर्माण होवून शेतकर्यांना जादा पैसे मिळणार आहेत.
Post a Comment