लक्ष्मीदहिवडी / प्रतिनिधी
एकीकडे दुष्काळ, अतवृष्टी, अवकाळी पाऊस, खराब हवामान याचा सामना करत शेतकरी जगत असताना शेतकर्यांच्या मालास कवडीमोल झालेली किंमत यामुळे शेतकरी कचाट्यात सापडला आहे. या सर्व गोष्टीचा सामना करुन ज्या शेतकर्यांनी मका पिकाचे उत्पादन घेतले, त्या मकाचे दरही उतरले आहेत. शेतकर्यांसाठी शासनाने मका खरेदी केंद्रे सुरु करावीत, अशी मागणी कृषी क्रांती फार्र्मस क्लबचे अध्यक्ष अंकुश पडवळे यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक संकटांना तोंड देऊन शेतकर्यांनी मक्याचे उत्पादन घेतले आहे. परंतु उत्पादन खर्चाएवढीही किंमत मिळत नसल्याने मका शेतकरी संकटात सापडला आहे. एका क्विंटलला ८५0 ते ११00 रुपयेदरम्यान बाजारभाव मिळत आहे. शासकीय मका खरेदी केंद्र सुरु नसल्याने शेतकरी नाईलाजास्तव कमी दराने व्यापारी मागेल त्या किमतीने विकत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी तालुक्यात मार्केटिंग बोर्डाच्यावतीने ताबडतोब मका खरेदी केंद्रे सुरु करावीत, अशी मागणी पडवळे यांनी जिल्हाधिकार्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनाच्या प्रती खा. विजयसिंह मोहिते-पाटील, खा. शरद बनसोडे, आ. भारत भालके, आ. दीपक साळुंखे- पाटील व जि.प. अध्यक्षा जयमाला गायकवाड यांना दिल्या आहेत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment