आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी आपली दैनंदिन जीवनशैली ही योग्य असणे गरजेचे आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये आरोग्य हा महत्त्वाचा घटक असून त्यामध्ये केवळ शारिरीक आरोग्यच नव्हे तर, मानसिक आरोग्यही चांगले असणे आवश्यक आहे. कारण, मानसिक ताणतणावाचा आपल्या आरोग्यावर प्रत्यक्ष परिणाम होत असल्याने ताणतणावापासून दूर राहण्यासाठी नियमितपणे प्राणायाम व व्यायाम अत्यंत आवश्यक असल्याचे मत माजी नगराध्यक्ष डॉ. प्रभाकर माळी यांनी एन.एस.एस.च्या श्रमसंस्कार शिबिरामध्ये व्यक्त केले. सांगेला येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या वतीने नाझरे येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत श्रमसंस्कार शिबिरामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. माळी बोलत होते. अध्यक्षस्थानी अशोक पाटील हे होते. हे शिबीर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संस्थेचे सचिव विठ्ठलराव शिंदे, प्राचार्य प्रतापराव बनसोडे, प्रा. संतोष राजगुरू, प्रा. संतोष जाधव, प्रा. शशीकांत गायकवाड, प्रा. मिलींद देशमुख व ग्रामविस्तार अधिकारी जाधव यांनी परिश्रम घेतले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment