(शंतनु शेळके, सांगोला) - स्वाभिमानी शेतकरी संघटना एक असा पक्ष ज्या पक्षाला एकेकाळी शेतकरी आपला ‘माय-बाप’ मानत असत; आणि हे सत्य कुणीच नाकारू शकणार नाही. खा.राजु शेट्टी, सदाभाऊ खोत व या संघटनेचे इतर पदाधिकारी यांनी ज्या पध्दतीने शेतकर्यांच्या हितासाठी एका आगळ्या-वेगळ्या, आक्रमक शैलीत सरकारविरुध्द आंदोलने केली त्या आंदोलनांमुळे या संघटनेत ‘खरा स्वाभिमान’ असल्याचे सर्वसामान्य शेतकरी वर्गातून बोलले जात असे. इवल्याशा रोपट्याचे वटवृक्षात रुपांतर झाले... या संघटनेच्या एकीपुढे कारखानदार व मातब्बर राजकारणी सुध्दा झुकल्याचे दिसून आले. मात्र भल्या-भल्यांना हादरवून सोडणार्या या संघटनेतच फुट पडली आणि शेतकर्यांना योग्य दिशा दाखविणारी ही संघटनाच दिशाहीन बनली... शेतकर्यांचे एक मजबुत संघटन बनलेल्या या संघटनेत ‘राजकारण’ शिरले... संघटनेच्या वटवृक्षाची खोलवर रुजलेली मुळे सुध्दा हादरली... पाने गळू लागली... संघटनेत गट-तट पडले... ‘चळवळीत जेंव्हा राजकारण शिरते तेंव्हा काय घडते याचे हे उत्तम उदाहरण म्हणावे लागेल’ असो... विधानसभेच्या निवडणुकीनंतर या संघटनेच्या शिलेदारांमध्ये अधिकच बिनसले... होत्याचे नव्हते झाले... वटवृक्ष उन्मळून पडला... पाखरे उडाली... सैरभैर झाली.... संघटनेत फुट पडली... शेतकर्यांसाठी लढा देणार्या एका सक्षम पर्यायाला अनेक पर्याय उपलब्ध झाले... हे पर्याय ‘स्वाभिमानी’ प्रमाणे सक्षम ठरतील की नाही हे समजेलच... मात्र अजूनही वेळ गेलेली नाही... खा. शेट्टी यांनी पुन्हा एकदा संघटनेची बांधणी करण्याचे प्रयत्न केले पाहिजेत मात्र हे करत असताना आपल्या राजकीय इच्छा आकांक्षांना तिलांजली देवून पुन्हा ‘शेतकरी’ डोळ्यासमोर ठेवत आपला ‘स्वाभिमान’ जागृत करणे अत्यावश्यक आहे. यासाठी आपल्या अधिकारांचा वापर करत सत्ताधार्यांना शेतकर्यांच्या मालाला योग्य हमीभाव देण्यास भाग पाडा...! सत्तेकडे नको शेतकर्यांकडे बघा...!
प्रत्येकवेळी शेतकर्यांच्या न्यायासाठी लढणारी स्वाभिमानी शेतकरी संघटना यंदाही ऊसदरासाठी मैदानात उतरली आहे. हे निश्चितच स्वागतार्ह आहे मात्र यंदा त्यांची थोडी गोची होण्याची शक्यता आहे... कारण स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊसदारासाठी आजतागायत जरी राज्य सरकार विरोधात लढत आली असली तरी यंदा स्वाभिमानी शेतकरी संघटना ही राज्य सरकारचा एक घटक पक्ष असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकर्यांच्या न्यायासाठी ऊसदारासाठी आंदोलन करून राज्य सरकारला शेतकर्यांची ताकत दाखविणार की, आंदोलनाचे गाजर शेतकर्यांना दाखवून आपल्या मंत्रीपदाचे स्वप्न पूर्ण करणार याबाबत शेतकर्यांमध्ये उलट-सुलट चर्चा चाललेली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला युवा शेतकरी वर्गाचा चांगला पाठींबा असल्याने आजपर्यंत अनेक आंदोलन,मोर्चे या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काढले आहेत आणि अनेक वेळा संघटनेच्या पदाधिकार्यांसह शेतकर्यांना पोलिसांच्या लाठ्या खाव्या लागल्या आहेत. पण यंदा परिस्थिती थोडी वेगळी होण्याची शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्यातील 2 ठिकाणी स्वाभिमानी संघटनेने आपले तगडे उमेदवार दिले होते पण दुर्दैवाने त्यांचा दारूण पराभव झाला. पण इथे प्रश्न थोडा वेगळा आहे, ‘‘संघटनेने ज्या उमेदवारांना आपली उमेदवारी दिली होती त्यातील काहींचे स्वत:चे साखर कारखाने आहेत. तेही या संघटनेच्या ताब्यात तसेच राज्य सरकारचा एक घटक पक्ष हे असल्याने राज्य सरकारही यांच्याच ताब्यात त्यामुळे खा.राजू शेट्टी ऊसदर वाढवून मागतायत तरी कोणाला? हेच काही शेतकर्यांना कळेनासं झालय... आणि तुम्ही राज्य सरकारला खनखनीतपने सांगता कि ऊसाला योग्य उचल द्या अन्यथा विरोधात आंदोलन करू.. बर जरी तसं केल कि तुम्ही राज्य सरकारच्या विरोधात जाण्याचे धाडस जर केल तरी होणार काय ? शेतकरी रस्त्यावर येणार.... आंदोलन करणार.... पोलिसांच्या काठ्या खाणार.... याबाबत शेतकर्यांच्याच मनाची संभ्रमावस्था झालेली आहे. त्यामुळे शेट्टीसाहेब भाकरी हातात असताना तुम्ही तुकड्यावरती जगू नका... आणि देणारे आहात तुम्ही मंत्रिपद मिळवण्यासाठी शेतकर्यांना वार्यावर सोडून सत्ताधार्यांच्या हातचे बाहुले बनू नका... तुम्हाला आंदोलन करण्याची गरज नाही... तुम्ही सविस्तर विचार करून चर्चा करा आणि तुमच्या पदाधिकार्यांच्या ताब्यात असलेल्या कारखान्यांची उचल 2700 द्या.... राज्यात नक्की हा नियम लागू होईल. तुम्ही बदला राज्यात बदल अपोआप घडेल...! ‘राजपाट लाथाडून पुन्हा जमीनीवर या..’
दरवर्षी ऊसदर निश्चितीसाठी ऊसदर निश्चित नियामक समिती नव्याने स्थापन करण्यात आली आहे या समितीचे खा.शेट्टी हे सदस्य आहेत.ज्या कारखान्याला उचल मागायची त्यामधले बहुतेक कारखाने यांचे...ज्यांच्याकडे मागणी करणार ते राज्य सरकार यांचे...आणि जे जाहीर करणार त्या समितीचे सदस्यही हेच...मग शेट्टीसाहेब आता तुम्हाला ऊसदरासाठी तरी आंदोलन करण्याची गरज नाही... सत्तेत तुम्ही सहभागी आहातच... ठणकावून सांगा ‘शेतकर्यांच्या ऊसाला योग्य भाव मिळायलाच हवा..’ हा प्रश्न चर्चेद्वारे सोडवता येईल.. राजकारणात जे शक्य ते कराच मात्र सर्वसामान्य शेतकर्यांच्या हातात हात घालून आपल्या संघटनेची नव्याने पुनर्बांधणी करा... आपणास मंत्री पद नाही मिलाले तरी चालेल मात्र सत्ताधार्यांचे लांगुलचालण करु नका... शेतकरी आणि ही संघटना यांना केंद्रस्थानी ठेवून ही चळवळ जिवंत ठेवा... यासाठी मात्र राजपाट लाथाडून पुन्हा जमीनीवर या... स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा वाघ समजले जाणारे खा. राजु शेट्टी व संघटनेचे इतर कांही पदाधिकारी यांनी विधानसभेच्या पार पडलेल्या निवडणुक काळात संघटनेच्या एकीकरणास बाधक ठरणारे कांही निर्णय घेतले आणि संघटनेत फुट पडली... यामध्ये स्वाभिमानी शेतकर्यांचा स्वाभिमान दुखावला गेला... शेतकर्यांवर ज्यांनी गुन्हे दाखल केले अशांच्याच दारात शेतकर्यांना बोलावून राजकीय प्रचार करायला लावणे हे आम्हाला मान्य नाही म्हणत विधानसभा निवडणुक काळात संघटनेच्या अनेक पदाधिकार्यांनी संघटनेच्या बाहेर जाणे पसंत केले. हे कटुसत्य आहे.... याचे उमटलेले तीव्र पडसाद निवडणुक काळात आणि त्यानंतरही स्वत: खा. राजू शेटी, सदाभाऊ खोत आणि संघटनेच्या इतर पदाधिकार्यांनी स्वत: अनुभवलेत... आम्हाला वाटत नाही की याबाबत खा.शेट्टी किंवा त्यांचे इतर सहकारी अनभिज्ञ असतील. मात्र शेतकर्यांच्या हितासाठी झटणार्या एका चांगल्या नावारुपास आलेल्या एका संघटनेचा ‘अस्त’ होऊ नये... ‘शेतकरी हीत’हा या संघटनेचा खरा ‘आत्मा’ आहे याचा विचार करून खा. राजू शेट्टी व त्यांच्या शिलेदारांनी वेळीच योग्य निर्णय घ्यावा म्हणून आमच्या कांही शेतकरी वाचकांच्या आग्रहास्तव हा लेख लिहीण्याचा खटाटोप आम्ही करत आहोत... बाकी काय निर्णय घ्यायचा यासाठी शेट्टी साहेब आपण सुज्ञ आहातच...
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment