0

खा.राजू शेट्टींचा घरचा आहेर
नवी दिल्ली : निवडणुकांच्या काळात नरेंद्र मोदींनी स्वामीनाथन समितीच्या शिफारशी लागू करण्याचं आश्वासन दिलं होतं. आता सरकारला त्याचा विसर पडला का? असा सवाल करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी लोकसभेत सरकारला घरचा आहे दिला आहे. 'उत्पादन खर्च आणि त्यावर 50 टक्के नफा, या धोरणानुसार आधारभूत किंमत ठरवावी अशी शिफारस स्वामीनाथन समितीनं केलेली आहे. ती त्वरीत लागू करावी आणि शेतकऱ्यांना आधार द्यावा अशी मागणी राजू शेट्टींनी केली आहे. मात्र स्वामीनाथन समितीच्या नव्या शिफारसी अजून समोर यायच्या आहेत. त्यानंतर यावर निर्णय घेऊ असं आश्वासन कृषी राज्यमंत्री डॉ संजीवकुमार यांनी दिलं. त्यामुळं आता सरकारमध्ये असलेले सहकाऱ्यांनीच सरकारवर तोंडसुख घ्यायला सुरुवात केल्याचं चित्र आहे.

Post a Comment

 
Top