कर्जबाजारीपणाला कंटाळून तपकीरी शेटफळ (ता.पंढरपूर) येथील ज्ञानेश्वर महादेव कोळी (वय-50) या शेतकर्याने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शनिवारी दुपारी चार च्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, ज्ञानेश्वर कोळी हे अल्पभुधारक शेतकरी होते. गेल्या दोन वर्षापासून निसर्गाने साथ न दिल्याने लागवडीचा खर्च देखील निघत नसल्याने ते चिंतीत होते. बँकेचे कर्ज कसे फेडायचे या चिंतेत त्यांनी विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविली .
अवकाळी पाऊस, गारपीट अशा एकापाठोपाठ आलेल्या आस्मानी संकटापुढे शेतकरी हतबल झालेला आहे. प्रसंगी कर्ज काढून बी-बियाणे-खते-औषधे विकत आणायची... रात्रंदिवस ऊन्ह वार्याची पर्वा न करता रक्ताचं पाणी करुन शेतात राबायचं... आणि एवढं करुनही हाताला घामाचा दाम मिळण्याऐवजी कर्जाचं ओझं डोक्यावर वाढलेलं पाहून शेतकरी हताश झालेला आहे. अशा परिस्थितीत शेतकर्यांना आधार देणं हे शासनाचं कर्तव्य आहे. प्रशासनाने या गोष्टीची गंभीर दखल घेत शेतकर्यांना दिलासा मिळेल यासाठी आवश्यक ती पावले तत्परतेने उचलणे गरजेचे आहे
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment