0


नितीन अग्रवाल, नवी दिल्ली

दिल्लीतील निवडणुकीच्या महाभारतात भाजपा स्वत:च रचलेल्या चक्रव्यूहात फसत असल्याचे चित्र आहे. आम आदमी पार्टीचे(आप) संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यावर प्रचारकी हल्ल्यासाठी बनविलेल्या व्यंगचित्राने भाजपाची अडचण वाढविली आहे. या व्यंगचित्रात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घातलेला असल्याने वाद पेटला आहे. ‘आप’ने या मुद्द्यावरून लक्ष्य बनविताच भाजपाला उत्तर देणे अवघड झाले आहे. केजरीवाल मुुलांच्या डोक्यावर हात ठेवत शपथ घेत असतानाच काँग्रेसशी हातमिळवणी करीत असल्याचे दाखविण्यात आले आहे. अण्णांच्या प्रतिमेला हार दाखवत भाजपाने जणू त्यांची हत्या केली असून, त्याबद्दल भाजपाने माफी मागावी, अशी मागणी केजरीवाल यांनी केली आहे.

Post a Comment

 
Top