* जम्मू काश्मीरमध्ये सत्ता स्थापनेत विलंब होतोय, पण लवकरच राज्यात स्थिर सरकार स्थापन होणार - राम माधव, भाजपा नेते
* छत्तीसगडमध्ये नारायणपूर जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलींमध्ये चकमक, एक जवान शहीद, तीन जखमी.
* संजय दत्त पुन्हा तुरुंगात, फर्लो रजेत वाढ न झाल्याने संजय दत्त पुन्हा येरवडा तुरुंगात हजर.
* माझ्यावरील वैयक्तीक आरोपांना मी उत्तर देणार नाही, त्यांना मला जे म्हणायचंय ते बोलू द्या, मी कसा आहे हे दिल्लीकरांना माहित आहे, मी भ्रष्टाचारी नाही - केजरीवाल
* दिल्ली भाजपाकडे नेतृत्व नाही, ते एकमेकांशीच भांडत बसलेत - केजरीवाल
* भाजपा महिलांच्या विरोधात आहे, भाजपाच्या काळातही महिलांना असुरक्षित वाटतंय - केजरीवाल
* हिंदूंनी चार मुलांना जन्म द्यावा असे भाजपा नेते सांगतात, महिला जन्म देणारी मशिन आहे का ? - केजरीवाल
* दिल्लीत महागाई वाढली आहे, भाज्यांचे भाव चार पटीने वाढलेत पण भाजपा सर्वसामान्यांची थट्टा करत आहे - अरविंद केजरीवाल
* जेव्हापासून केंद्रात भाजपाची सत्ता आली आहे तेव्हापासून दिल्लीत झोपडपट्टीवरील संकट वाढले आहे - अरविंद केजरीवाल
* दिल्लीतील वीज दरांमध्ये ५० टक्क्यांची कपात करण्याचा फॉर्म्यूला फक्त आपकडेच - अरविंद केजरीवाल
* केंद्रात भाजपाची सत्ता येऊन सहा महिने झालेत, लोकसभा निवडणुकीत दिलेले एकही आश्वासन भाजपाने अद्याप पूर्ण केलेले नाही - अरविंद केजरीवाल
* राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या छायाचित्र प्रदर्शनाला दिली भेट, दुष्काळग्रस्त शेतक-यांच्या आर्थिक मदतीसाठी उद्धव ठाकरे यांनी भरवंलय प्रदर्शन.
* आम आदमी पक्ष आणि भाजपा या दोन्ही पक्षांनी दिल्लीकरांना अनेक आश्वासनं दिली पण यापैकी एकही आश्वासन पूर्ण केले गेले नाही, त्यांनी जनतेला फसवलं - काँग्रेस
*मुंबई मेट्रोच्या प्रवासी भाड्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांची भेट घेतली, नायडू यांनी यासंदर्भात उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली समिती नेमली.
* कोलकाता - मुंबई ज्ञानेश्वरी एक्सप्रेसमध्ये सापडले २ किलो सोने, जळगाव रेल्वे स्थानकावरची घटना.
* संयुक्त राष्ट्र संघाचे सचिव बान की मून यांचे दिल्लीत आगमन, मून हे चार दिवसांच्या भारत दौ-यावर असून या भेटीत ते उच्चस्तरीय चर्चाही करणार आहेत.
* पश्चिम बंगालमध्ये तृणमूल आणि भाजपामधील संघर्ष शिगेला, बीरभूममध्ये दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते भिडले, दोन कार्यकर्ते व एक पोलिस जखमी.
* शशी थरुर यांनी सुनंदा पुष्कर यांची हत्या केली नाही, पण त्यांना मारेकरी कोण आहेत हे माहित आहे - सुब्रमण्यम स्वामी, भाजपा नेते
* मीडियाने बाऊ केल्यामुळे वाढीव रजा मिळाली नाही - संजय दत्त
* पंतप्रधान काळा पैसा, हिंदूंनी चार मुलांना जन्म द्यावा, महिलाची सुरक्षा, या मुद्यांबाबत का बोलत नाहीत? - आपचे नेते सोमनाथ भारती यांचा सवाल
* संचित रजेची (फर्लो) मुदत वाढवून देण्यास नकार मिळाल्याने संजय दत्त मुंबईहून येरवडा तुरूंगाच्या दिशेने रवाना.
* अराजकता माजवणारे चांगलं सरकार देऊ शकत नाहीत. दिल्लीत हे चालमार नाही, ज्यांना अराजकता माजवायची असेल त्यांनी नक्षलवाद्यांसोबत जावे - नरेंद्र मोदींचा केजरीवाल यांच्यावर हल्ला
* ज्यांना जे काम येत त्यांना तेच करू द्या. ज्यांना आंदोलन करता येतं त्यांनी ते करावे, आम्हाला चांगल्या पद्धतीने सरकार चालवता येतं, आम्हाला ते करू द्या - नरेंद्र मोदी.
* दिल्लीचं एक वर्ष फुकट घेलंय, आणखी काळ वाया घालवू नका. दिल्लीत संपूर्ण बहुमताचे,स्थिर सरकार निवडून द्या - मोदींचे दिल्लीवासियांना आवाहन.
* विकासवाद हे आमचे ध्येय आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
* भारतातील सर्व जनतेने भाजपाला हृदयात स्थान दिले आहे. जो देशाचा मूड आहे तोच दिल्लीचा मूड आहे. देशभरात भाजपाला विजय मिळालाय, दिल्लीतही मिळणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
* भारताच्या सीमेवर आजही आधीच्या सारखाच गोळीबार होतो, परंतु आता पाकिस्तान गोळीबाराची सुरुवात करतो आणि दुप्पट जोमाने प्रत्युत्तर देत भारतीय जवान गोळीबाराला विराम देतो असेही भाजपा अध्यक्ष अमित शाह म्हणाले.
* निवडणुकीआधी मोदी सरकारनं दिलेली सगळी आश्वासनं पाळण्यात येत असल्याचा दावा एमित शाह यांनी दिल्लीतल्या भाषणात केला आहे.
* भाजपानं आम आदमी पार्टीचा बनावट गर्दीचा आरोप फेटाळून लावताना रामलीला मैदानावर झालेली गर्दी नरेंद्र मोदींचं भाषण ऐकायला स्वत:हून आलेली असल्याचं म्हटलं आहे.
🙏
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment