:-
संकलन -दत्तात्रय नवत्रे
* जम्मु- काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू करण्यात आली आहे.
* पूर्व पॅरिसमधील कोशेर येथील सुपर मार्केटमध्ये पुन्हा हल्ला झाला असून एक व्यक्ती जखमी झाल्याचे वृत्त आहे.
* सुनंदा पुष्कर हत्येप्रकरणी सुनील नावाच्या व्यक्तीची चौकशी दिल्ली पोलीस करणार, सुनंदाच्या मृत्यूच्या आधी दोन दिवस ती सुनीलला भेटल्याचे चौकशीतून समोर आले आहे.
* दिल्लीच्या पोलीस आयुक्तांना थरुर यांनी पत्र लिहले आहे.
* माझ्या पत्नीच्या मृत्यूचा मी शोकही व्यक्त करु शकत नाही- शशी थरुर
* बनावट डिग्री देणा-या टोळीमध्ये सहभाग असल्याच्या आरोपाखाली जोधपूर नॅशनल युनिवर्सिटीच्या अध्यक्षांना अटक करण्यात आली आहे.
* एक पती म्हणून पोलिसांना सहकार्य करणे हे माझे कर्तव्य आहे. - शशी थरुर
* सुनंदाच्या हत्येबाबत उघडपणे भाष्य करणे पोलिसांच्या तपासकामात अडथळे येऊ शकतात - शशी थरुर
* तब्बल ८८ हजार पोलीसांनी डेमार्टीन एन गोले येथील एका छापखान्याला वेढा घालून दोन दहशतवाद्यांना पकडले आहे.
* पॅरीसमध्ये हल्ला करणा-या दोन दहशतवाद्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.
* जम्मु- काश्मीरचे राज्यपाल एन.एन. व्होरा यांनी मुख्य सचिव इक्बाल खांडे यांची भेट घेणार.
* काश्मीरमधील राज्यपाल राजवट प्रकरणी राज्यपाल एन.एन. व्होरा यांनी बोलवली बैठक.
* पॅरीस मध्ये हल्ला करणा-या दहशतवाद्यांना बक्षीस जाहीर करणा-या बसप नेते हाजी याकुब कुरेशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
* पॅरिस हल्ला: काही नागरिकांना ओलीस ठेवण्यात आल्याचे वृत्त आहे
* पॅरिसमध्ये सलग तिस-या दिवशी गोळीबार, उत्तर-पूर्व भागात दोन संशयित दिसल्याची माहिती
* ड्रग्ज प्रकरणात जॅकी चॅनच्या मुलाला ६ महिन्यांच्या तुरूंगवासाची शिक्षा.
* मुंबई मेट्रोची तिकीट दरवाढ आजपासूनच लागू
* पवनचक्कीच्या कामादरम्यान जिलेटिनचा स्फोट, एक कामगार ठार तर ५ जखमी. साता-यातील माण तालुक्यातील बोथे येथील घटना.
* उस्मानाबादमध्ये उपलाईजवळ एसटी-ट्रकचा अपघात, तीन प्रवासी ठार तर ४ गंभीर जखमी. नगर-तुळजापूर बस आणि ट्रकची झाली टक्कर
* क-हे घाटाजवळील शेतक-यांच्या रास्ता-रोकोमुळे नाशिक -पुणे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत
* बोरघाट चौकीजवळ ट्रक उलटल्याने मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी
* श्रीलंका: महिंदा राजपक्षेंना पराभवाचा धक्का, मैत्रीपाला सिरिसेना श्रीलंकेचे नवे राष्ट्राध्यक्ष. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवनिर्वाचित अध्यक्ष मैत्रीपाला सिरिसेना यांचे केले अभिनंदन.
* बोरगांव दे(अक्कलकोट) येथे ऊसाच्या भरलेला ट्रकचा वरचा भाग विजेच्या तारेला लागल्यामुळे शाॅट सर्किट झाले . त्यामुळे गुंडप्पा श्रीमंत पट्टणशेट्टी यांचे अडीच एकर ऊस जळून खाक . ही घटना आज दुपारी ठिक १२.३० वा.घडली
________________________________________
Post a Comment