0

लक्ष्मीदहिवडी / प्रतिनिधी
गावपातळीवर छोट्या मोठय़ा कारणावरून निर्माण होणार्‍या तंट्याचे पर्यवसन मोठय़ा तंट्यात होऊ नये, गावात वादविवाद होऊ नयेत गावातील तंटे गावातच मिटविले जावे यासाठी २00७ सालापासून महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानास सुरूवात झाली. गावातच्या गावात तंटे मिटवून शांतता टिकवून ठेवणार्‍या गावांना सन्मानपूर्वक बक्षिस जाहीर केली. यामध्ये मंगळवेढा तालुक्यातील महमदाबाद (शे) या गावाला तंटामुक्त गाव म्हणून एक लाखाचे बक्षिस देऊन सन्मानित करण्यात आले. महात्मा गांधी तंटामुक्त गांव अभियानांतर्गत महमदाबाद (शे) या गावाला मंगळवेढा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप पाटील यांनी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष भीमराव पाटील यांना सरपंच योगेश नरळे, उपसरपंच सूर्यकांत पाटील यांच्या समक्ष एक लाखाचा धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले व या पैशाचा समाजहितासाठी, विकासासाठी वापर करण्याच्या सूचना दिल्या. गाव तंटामुक्त करण्यासाठी मंगळवेढा पोलीस स्टेशनचे विलास भोसले, एस.पी. आटपाडकर, आर.एस. देवकते व महमदाबाद (शे) चे ग्रामसेवक एम.पी. जुंदळे यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष भीमराव पाटील यांनी सांगितले.

Post a Comment

 
Top