0

राज्यात गुटख्या पाठोपाठ तंबाखू बंदीचा आदेश!

    
मुंबई : राज्यातील मागील सरकारने गुटखा, पानमसाला यांच्या विक्री आणि सेवनावर बंदी केली असताना आता राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी तंबाखूच्या सेवनावर राज्यात बंदी लागू करण्याची घोषणा केली आहे. विधी व न्याय खात्याचे याबाबत मत घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्याचे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे कर्करोगाने निधन झाले. तंबाखू्च्या सेवनामुळे दरवर्षी अनेकांचा कर्करोगाने मृत्यू होतो याकडे डॉ. सावंत यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, तंबाखू सेवन तब्येतीकरिता हानीकारक असल्याच्या जाहिराती केल्या जातात. लोकांमध्ये जनजागृती करण्याकरिता सतत प्रयत्न केले जातात. मात्र तरीही लोकांमध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण अजून लक्षणिय आहे. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यावर बंदी आहे. गुटखा व पानमसाला याचे सेवन करणे, बाळगणे अथवा विक्री करणे यावर निर्बंध आहेत. मात्र आता कर्करोगाला कारण ठरणाऱ्या तंबाखूवरही बंदी घातली जाईल.

Post a Comment

 
Top