मंगळवेढा तालुक्यातील ३५ गावामधील एक गाव ज्या गावातून ३५ गावच्या पाण्याचा प्रश्न पेटला अशा खुपसंगी गावाने ग्रामसभा घेऊन तालुका कृषी अधिकारी व कृषीक्रांती फार्र्मस क्लबच्या सहकार्याने तब्बल १00 शेततळी करण्याचा निर्णय घेतला आहे. खुपसंगी येथे कृषी विभाग व कृषीक्रांती फार्र्मस क्लब व ग्रामपंचायत यांनी एकत्रित येऊन ग्रामसभा घेतली. या ग्रामसभेत रोजगार हमी योजनेतून शंभर शेततळी पाडण्याचा निर्णय झाला. यावेळी सदर लाभ घेणार्या लाभार्थ्यांना ग्रामपंचायतकडून शेततळ्यासाठीच्या ठरावाची नक्कल व जॉबकार्ड काढण्याचा ही कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी बोलताना तालुका कृषी अधिकारी गजानन ताटे म्हणाले, या गावातील शेतकर्यांनी गावात रोहयोमधून १00 शेततळी करून दुष्काळी भागातील शेतकर्यांपुढे आदर्श निर्माण करावा, कृषी विभाग गावच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, आमच्याकडून शेतकर्यांना संपूर्ण सहकार्य मिळेल, असे आश्वासन दिले. यावेळी कृषी क्रांती फार्र्मस क्लबचे अध्यक्ष अंकुश पडवळे, कृषी सहाय्यक प्रशांत काटे, उपसरपंच दादा भोसले, दामोदर बंडगर, आण्णा माळी, दिनेश लेंगरे, कुशाबा पडवळे, विक्रम पांढरे यांच्यासह ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment