0

सात वर्षांच्या आकाशची विहिरीत 12 तास मृत्यूशी झुंज
मोहोळ- शेतातील झाडाखाली बागडणारे चिमुकले भाऊ-बहीण... दुपारच्या उन्हामुळे त्यांना सोडून झाडाच्या सावलीत विसावलेल्या वडिलाचा डोळा लागला... आणि हीच संधी साधून सावत्र आईने मधाचे आमिष दाखवून दोघांना विहिरीवर नेले... सख्खी आणि सावत्र याचा भावही मनी नसलेल्या आणि त्याचा बोधही होणाऱ्या त्या अबोध चिमुकल्यांना काय माहीत की, हे मधाचे बोट दाखवणारी माताच आपली वैरिण ठरणार आहे...

ती दोघांना विहिरीत टाकून वस्तीवर परतली... सर्वत्र शोध घेऊन मध्यरात्रीच्या सुमारास विहिरीवर पोहोचलेल्या ग्रामस्थांपैकी एकाने हाक मारली... आणि ओळखीच्या आवाजाला आकाश (वय ६) ने प्रतिसाद दिला...विहिरीतील पाइपच्या साहाय्याने काठ गाठलेला आकाश सुमारे बारा तास मृत्यूशी झुंज देत सुटकेच्या प्रतीक्षेत होता...तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर त्याला बाहेर काढण्यात आले... परंतु त्याची बहीण साक्षी हिचा (वय ७) मृत्यू झाला होता...ही हृदय िपळवटून टाकणारी आणि चिमुकल्याच्या जीवघेण्या संघर्षाची घटना आहे मंगळवारी (दि. १७) यावली येथून गायब झालेल्या मुलांची.
मंगळवारी दुपारी एक वाजता संजय वसंत माळी हे शेतातील झाडाखाली मुलांना सोडून झोपी गेले. ते उठल्यानंतर त्यांची साक्षी आकाश ही दोन्ही मुले गायब होती. त्यांनी शोध घेऊनही सापडल्याने मोहोळ पोलिसांत अपहरणाची िफर्याद िदली. त्यानंतर पोलिस िनरीक्षक सूरज बंडगर, सहायक पोलिस िनरीक्षक धनाजी जळक, काॅन्स्टेबल लोबो चव्हाण, बजरंग माने यांच्या पोलिस कर्मचारी ग्रामस्थांनी परिसरातील िपके, विहिरी, नाल्यांमध्ये शोध सुरू केला. दरम्यान, मुलांची सावत्र आई उषा (वय ३५) हिची चौकशी केली. तिच्या जबाबात विसंगती आढळल्याने पोलिसांचा संशय बळावला. तसेच रात्री बाराच्या सुमारास सुमारे ५० ग्रामस्थ त्यांचा शोध घेत संजय माळी यांच्या विहिरीवर पोहोचले. गावातील एकाने "आकाश' अशी हाक िदली आणि परिचित आवाजामुळे आकाशने विहिरीतून प्रतिसाद िदला. त्यामुळे ग्रामस्थांचा जीव भांड्यात पडला.

सहा महिन्यांपूर्वी केला होता दुसरा विवाह...,

साक्षी आकाश ही संजय माळी यांना पहिल्या पत्नीपासून झालेली मुले. अडीच वर्षांपूर्वी त्यांची पहिली पत्नी बेपत्ता झाली. तिचा शोध लागला नाही. मात्र, मुलांचे आबाळ व्हायला लागले. त्यामुळे त्यांनी सहा महिन्यांपूर्वी माढा येथील उषा हिच्याशी दुसरे लग्न केले. निरागस चिमुकले आई मिळाल्याने आनंदात होते . परंतु तीच त्यांच्यासाठी काळ बनली.

सावत्र आईला अटक, तपास सुरू

मुलांचा सांभाळ, घरातील कामांना ती कंटाळली होती. आई आई म्हणत आपल्या अंगाखांद्यावर खेळणाऱ्या साक्षी, आकाशच्या निरागसतेनेही तिच्या मातृहृदयाला पान्हा फुटला नाही आणि तिने दोन्ही मुलांना विहिरीत फेकुन दिले. याप्रकरणी पोलिसांनी केलेल्या तपासात तिने विसंगत माहिती दिली. तसेच मुलगा आकाश याच्या सांगण्यावरुन तिनेच त्यांना विहिरीत फेकल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे मोहोळ पोलिसांनी तिला अटक करुन तपास सुरू केला आहे.

वर आला अन् लोकांना पाहून टाहो फोडला.,...

ग्रामस्थांनी विहिरीवर गवत पेटवून, गाडीच्या दिव्याने प्रकाशाची व्यवस्था केली. जिवाची पर्वा न करता रमेश दळवी हा तरुण दोरीच्या साहाय्याने विहिरीत उतरला. त्याने पावणेदोनच्या सुमाराला आकाशला सुखरूप बाहेर काढले. विहिरीवर आल्यानंतर भेदरलेल्या आकाशने टाहो फोडला. पोलिस निरीक्षक सूरज बंडगर यांनी त्याला ताई कुठे आहे, अशी विचारणा केली. त्यावर त्याने आईने आधी बहिणीला आणि नंतर मला विहिरीत फेकून दिल्याचे सांगीतले. तसेच ती बुडून मृत्यू पावल्याचे म्हटले.

बुडताना पाइप धरला...

सावत्रआईने सुमारे ५०फूट खोल विहिरीत फेकल्यानंतर बुडताना आकाशने पाइपला धरले. त्याच्या आधाराने आकाश विहिरीच्या कडेला पोहोचला. मात्र, त्याला पायऱ्या नसल्याने काटेरी झुडपे वाढलेल्या विहिरीच्या तीन फुटांच्या कठड्यावर बसला. रात्र झाल्यानंतरही हा चिमुकला एकीकडे बहिणीच्या मृत्यूने भयभीत, हृदय विदीर्ण स्थितीत, मृत्यूशी झुंज देत तितक्याच धैर्याने मदतीच्या प्रतीक्षेत होता.

Post a Comment

 
Top