0

गावपुढार्‍यांनी टाकला सुटकेचा निश्वास

ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतीच्या निवडणुका अचानक जाहीर झाल्याने नेतेमंडळींमध्ये एकच तारांबळ उडाली होती. पण नाशिक येथील कुंभमेळ्याच्या नियोजनात पोलीस प्रशासन गुंतल्याचे कारण सांगून ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतीच्या निवडणुका पुढे ढकलल्याने गावपुढार्‍यांना आता मोर्चेबांधणीसाठी अधिक वेळ मिळाल्याने गावपातळीवरील नेतेमंडळी आनंदात आहेत. एकीकडे उन्हाचा कडाका, टंचाई या काळात अचानक निवडणुका लागल्याने प्रशासनावरही ताण येणार होता. तसेच सरपंच आरक्षण २७ मार्च रोजी जाहीर झाले आणि ३१ मार्च रोजी अर्ज भरण्यास सुरूवात होती. त्यामुळे आरक्षित जागांच्या उमेदवारांना कागदपत्रेही गोळ करण्यासाठी वेळ नव्हता. अशा परिस्थितीत सर्वच इच्छुक उमेदवार व नेतेमंडळी कोड्यात पडले होते. यामध्येच गावातील सत्ता बदल करण्याचा प्रय▪करणार्‍या नेतेमंडळींना फारच कमी वेळ मिळत होता. त्यामुळे तेही चिंतेत होते. मात्र, कुंभमेळ्याच्या निमित्ताने निवडणूक आयोगाने निवडणुका पुढे ढकलल्याने सर्व नेतेमंडळींनी आनंद व्यक्त केला असून इच्छुक उमेदवारांनाही कागदपत्राची जुळवाजुळव करण्यासाठी वेळ मिळणार आहे.

Post a Comment

 
Top