:- राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने आणि "बीव्हीजी इंडिया लिमिटेड' या सेवा क्षेत्रातील कंपनीच्या माध्यमातून चालविण्यात येणारी "महाराष्ट्र मेडिकल इमर्जन्सी सर्व्हिसेस'च्या "डायल 108' रूग्णवाहिका सेवा आपत्कालीन परिस्थितीत रूग्ण सेवा देते. मार्च 2015 पर्यंतच्या तपशीलानुसार "डायल 108' रूग्णवाहिकेमध्ये 2913 प्रसुती करण्यात आल्या. तसेच 78,503 महिलांना प्रसुति दरम्यान तातडीची वैद्यकिय सेवा देण्यात आली. 821 रुग्णांना रूग्णवाहिकेतील अत्याधुनिक व्हेंटीलेटर सुविधेच्या मदतीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. "डिफिब्रिलेटर'च्या मदतीने 92 रूग्णांना सेवा देण्यात आली.
मार्च 2015 अखेर पर्यंत 2 लाख 68 हजार 497 जणांना अत्याधुनिक रुग्णवाहिका सेवेचा लाभ मिळाला आहे.
"108' हा दूरध्वनी डायल केल्यानंतर "महाराष्ट्र इमर्जन्सी मेडीकल सर्व्हिस'च्या सुसज्ज रुग्णवाहिका मदतीला येतात. या आपत्कालीन वैद्यकीय सेवेच्या संचालनाची जबाबदारी "बी.व्ही.जी. इंडिया लिमिटेड' या सेवाक्षेत्रातील अग्रगण्य कंपनीकडे असून, पुण्यातील"औंध उरो रुग्णालयात' या सेवेचे प्रमुख केंद्र व "रिस्पॉन्स सेंटर' आहे.
मार्च 2015 पर्यंतच्या तपशीलानुसार राज्यातील रूग्णांना दिलेल्या आपत्कालीन "108' सेवेची जिल्हानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे, अहमदनगर (11, 876), अकोला (4702), अमरावती (9336), औरंगाबाद (11, 929), बीड (7709), भंडारा (3324), बुलढाणा (6768), चंद्रपूर (5218), धुळे (5112), गडचिरोली (1190), गोंदीया (3982), हिंगोली (4317), जळगांव (9847), जालना (4957), कोल्हापूर (12,603), लातूर (8727), मुंबई (22, 314), नागपूर (10, 044), नांदेड (10, 711), नंदूरबार (3767), नाशिक (13, 119), उस्मानाबाद (5508), परभणी (4525), पुणे (18,998), रायगड (3840), रत्नागिरी (2927), सांगली (9017), सातारा (8983), सिंधुदूर्ग (2330), सोलापूर (11, 837), ठाणे (12,623), वर्धा (2173), वाशिम (3493), यवतमाळ (8633), पालघर (1258).
"वेळेत उपचार न मिळाल्याने अपघातातील जखमींचा जीव जाण्याचे प्रमाण मोठे आहे ही गोष्ट लक्षात आल्यानंतर आरोग्य विभागाच्या आपत्कालीन वैद्यकिय सेवा प्रकल्पांतर्गत सुरू करण्यात आलेल्या "108 टोल फ्री' रूग्णवाहिका सेवेमुळे मार्च 2015 पर्यंतच्या कालावधीत 2 लाख 68 हजार 497 लोकांचे जीव वाचले.', अशी माहिती "बीव्हीजी इंडिया'चे अध्यक्ष एच. आर. गायकवाड यांनी दिली.
"26 जानेवारी 2014 रोजी सुरू झालेल्या या सेवेत अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज अशा 937 रुग्णवाहिका राज्यभर आहेत. यामध्ये 233 "ऍडव्हान्स लाईफ सपोर्ट' रूग्णवाहिका असून, 704 "बेसिक लाईफ सपोर्ट' रूग्णवाहिका समाविष्ट आहेत. या अत्याधुनिक वैद्यकीय सेवेसाठी "108' या दूरध्वनी क्रमांकावर डायल केल्यास विनामूल्य सेवा देणारी सुसज्ज रुग्णवाहिका डॉक्टरांसह येते. अपघात, हृदयविकार, भोवळ येणे, अर्धांगवायू, विषबाधा, आगीत भाजणे अशा अनेक प्रकारच्या आपत्कालीन स्थितीमध्ये ही रुग्णवाहिका बोलावता येते', अशी माहिती "महाराष्ट्र इमर्जन्सी मेडीकल सर्व्हिस'चे मुख्य संचालन अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर शेळके यांनी दिली.
--------------------------------------
Post a Comment