0

शेतकर्‍यांनी आधुनिक पद्धतीने ठिबक सिंचन, शेततळ्यांच्या माध्यमातून शेती केली तरच शेतकर्‍यांची प्रगती होणार आहे. शेतकर्‍यांनी कमी मजुरावर अत्याधुनिक ठिबक पद्धती वापरून शेती केली तरच शेतकरी फायद्यात येतील असे मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश काकाणी यांनी व्यक्त केले. माचणूर येथील प्रगतशील शेतकरी सुनिल डोके यांच्या आदित्य शेती फार्मवरील भेटीदरम्यान ते बोलत होते. यावेळी जिल्हा कृषी अधिकारी मदन मुकणे, गटविकास अधिकारी दत्तात्रय दराडे, तालुका कृषी अधिकारी गजानन ताटे, बाबर, कृषी अधिकारी नितीन चव्हाण, कृषीक्रांती फार्र्मस क्लबचे अध्यक्ष अंकुश पडवळे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना काकाणी म्हणाले, प्रत्येक शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम बनला तरच देशाची प्रगती शक्य आहे. यावेळी त्यांनी शेडनेट शेतीची पाहणी करून बारकावे जाणून घेतले. कृषीक्रांती फार्र्मस क्लबने शेडनेटच्या माध्यमातून मंगळवेढा तालुक्यात केलेल्या कामाचे त्यांनी कौतुक केले. यावेळी सुनिल डोके यांच्या आदित्य शेती फार्म हाऊसवर शरद हेंबाडे, हरिभाऊ यादव, अँड़ धनंजय हजारे, औदुंबर वाडदेकर, अतुल पाटील, तात्या यादव, अशोक चेळेकर, विठ्ठल आसबे, सुधाकर यादव, जयंत पवार, सुभाष डोके आदी उपस्थित होते.

Post a Comment

 
Top