0

मंगळवेढा तालुक्यातील महमदाबाद (शे) येथे बसवेश्‍वर जयंतीनिमित्त आज दि. १३ ते २0 एप्रिल रोजी अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळा आयोजित करण्यात आल्याची माहिती समस्त ग्रामस्थांकडून देण्यात आली. आज सोमवारी सकाळी महादेव स्वामी यांच्या हस्ते विना पूजनाने सप्ताहास सुरूवात होत आहे. सकाळी ८ ते ११ वाजता ज्ञानेश्‍वरी पारायण, ११ ते १२ गाथा भजन, सायंकाळी ५ ते ७ वाजता हरिपाठ, ७ ते ९ कीर्तन व रात्रभर हरिजागर असा कार्यक्रम होणार आहे. या सप्ताहामध्ये सात दिवस अनुक्रमे ह.भ.प. कदम महाराज, ह.भ.प. घोडके महाराज, ह.भ.प. चवरे महाराज, ह.भ.प. लाजूरकर महाराज, हभप फुले महाराज, हभप गरवारे महाराज व काल्याचे कीर्तन जोगदंड महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.

Post a Comment

 
Top