0

पंढरपूर / शहर प्रतिनिधी
एकरी उत्पादन वाढीसाठी पारंपारिक पीक पध्दतीला फाटा देऊन शेतकर्‍यांनी शेतीत आधुनिकता आणणे काळाची गरज आहे. महागाई वाढत चालल्याने डाळींबासारखी जादा नफा मिळवून देणारी पिके घेतली पाहिजेत, असे मत आ. भारत भालके यांनी व्यक्त केले. आ. भालके यांनी ईश्‍वरवठार येथील सेंद्रीय पध्दतीने डाळिंब उत्पादन घेणारे शेतकरी नागनाथ हळणवर यांच्या डाळिंब बागेची पाहणी केली. याप्रसंगी उपस्थित शेतकर्‍यांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी दामाजी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन सुर्यकांत ठेगील, 'विठ्ठल'चे संचालक मोहन कोळेकर, रायाप्पा हळणवर, माजी संचालक तानाजी चव्हाण, धनाजी घाडगे, माजी उपसभापती विजयसिंह देशमुख, विठ्ठल पाटील, शालीवाहन कोळेकर, बळीराजा शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष नितीन बागल, जिल्हाध्यक्ष माऊली हळणवर, मंगळवेढा तालुकाध्यक्ष संतोष पवार, पंडीत बागल, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नारायण देशमुख आदी उपस्थित होते. भरदुपारच्या रणरणत्या उन्हात आ. भालके यांनी सेंद्रीय डाळिंब बागेची पाहणी करण्यासाठी भेट दिल्याने परिसरातील शेतकरीही मोठय़ा संख्येने जमा झाले. यावेळी आ. भालके यांनी शेतकर्‍यांशी संवाद साधून अडीअडचणी जाणून घेतल्या. भूगर्भातील पाण्याची पातळी खालावत चालली असताना शेतकर्‍यांनी पुढील धोका लक्षात घेऊन पाण्याचा काटकसरीने वापर करावा. वेळीच संकट ओळखून शेतकर्‍यांनी पिकांचे आणि पाण्याचे नियोजन केले पाहिजे.

Post a Comment

 
Top