0

मुंबई : जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर माणूस काय करु शकतो याचा वस्तुपाठच मुंबईतील अविनाश चोगले यांनी घालून दिला आहे. 50 वर्षांचे चोगले तब्बल 28 व्या प्रयत्नात शालान्त परीक्षा उत्तीर्ण झाले आणि अखेर त्यांच्या मेहनतीचं चीज झालं.

मागील 30 वर्षं मंत्रालयात शिपाई म्हणून काम करणारे अविनाश चोगले 28 व्या प्रयत्नात दहावी परीक्षा उत्तीर्ण झाले आहे. विशेष म्हणजे चोगलेंच्या या कामगिरीचं खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केलं आहे.

अविनाश चोगले यांनी 1987 मध्ये पहिल्यांदा दहावीची परीक्षा दिली. मात्र हिंदी, गणित, इंग्रजी, इतिहास-भूगोल हे चार विषय राहिले. पण अपयशाने न खचता चोगलेंनी 2 ते 3 वेळा परीक्षा देत तीन विषय पार केले. मात्र गणिताने घात केला आणि त्यांना तब्बल 28 वेळा परीक्षा द्यावी लागली.

1987 ते 2015 या काळात बदललेल्या अभ्यासक्रमाचं आव्हान चोगलेंनी स्वीकारलं आणि दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले. आई-वडिलांचं लिपीक होण्याचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी दहावीची परीक्षा दिल्याचं चोगले सांगतात. परंतु यासाठी चोगलेंनी दाखवेलेली जिद्द खरोखरीच अनोखी आहे.

Post a Comment

 
Top