तीन वर्षापासून अनुदान रखडले?
तीन वर्षापासून फळबागांची तपासणीच सुरू?
हेलपाटे मारून शेतकरी मेटाकुटीला
लक्ष्मीदहिवडी / प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्यातील शेतकर्यांना कृषी विभागाकडून मिळणारे ठिबकचे अनुदान रखडल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. तालुक्यातील काही शेतकर्यांचे २0११-१२ सालचे अनुदान अद्याप मिळाले नाही व हे अनुदान कधी मिळणार याविषयीही कृषी कार्यालयाकडून ठामपणे काही सांगण्यात येत नसून टोलवाटोलवीची उत्तरे दिली जातात. त्यामुळे ठिबक सिंचनचे अनुदान अजून नेमकं कोणत्या कार्यालयात ठिबकतयं हे शेतकर्यांनाही कळेनासे झाले आहे.सन २0११-१२ साली ठिबक करून तालुका कार्यालयात प्रस्ताव सादर केले. मात्र, अद्याप त्या शेतकर्यांना अनुदान मिळाले नाही. या रखडलेल्या अनुदानासंबंधी शेतकर्यांनी आवाज उठविण्याचा प्रय▪केला की कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक, मंडल अधिकारी आळीपाळीने शेतकर्यांच्या ठिबकची तपासणी करतात व तुमचे अनुदान मिळून जाईल, म्हणून सांगून शेतकर्यांना गप्प बसवितात हा प्रकार २ ते ३ वर्षापासून सुरू आहे. यासंबंधी जिल्हा कृषी अधिकार्यांनी हा नेमका काय प्रकार आहे? याची चौकशी करणे गरजेचे आहे.या अनुदानासाठी ज्या शेतकर्यांनी प्रस्ताव सादर केले होते. त्यांच्या फळबागांचीही चार ते पाच वेळा या तालुक्यातील कृषी विभागाच्या अधिकार्यांनी तपासणी केली असून अनुदान मिळून जाईल, जरा धिर धरा, असा सल्ला ते शेतकर्यांना देत आहेत. पण कधी मिळणार हे ठामपणे सांगितले जात नाही. आंधळगाव मंडलमधील काही शेतकर्यांचे प्रस्ताव मातीपाणी परिक्षणाचे अहवाल खाजगी प्रयोगशाळेतील आहेत म्हणून बाजूला काढल्याचे समजते त्यांना शासकीय प्रयोगशाळेतून मातीपाणी परिक्षणाचे अहवाल आणण्यास सांगितले असून तेही अहवाल शेतकर्यांनी सादर केले आहेत. परंतु, कृषी विभागाकडून ही मातीपाणी परिक्षण केले जाते. दरवर्षी शेतकर्यांकडून मातीपाणी व रक्कम घेतली जाते. त्याचे अहवाल त्या प्रस्तावास का चालत नाहीत? अनेक शेतकर्यांनी माती पाणी तपासणीसाठी कृषी विभागाकडे नमुने सादर केले. पण शेतकर्यांना याचे रिपोर्ट कधी पहावयास मिळाले नाहीत.
तर धरणे आंदोलन करू
सन २0११-१२ पासून रखडलेल्या या ठिबक अनुदानाचा प्रश्न पंधरा दिवसात कृषी विभागाने मार्गी लावावा अन्यथा तालुका कृषी कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचे पं.स. सदस्य संजय पवार यांनी रोखठोक शी बोलताना सांगितले.
Post a Comment