0
नवी दिल्ली – केंद्र सरकारने वारंवार नोटीस दिल्यानंतरही सरकारी निवासस्थान रिकामे न केल्यामुळे जोरदार झटका देत वीज आणि पाणी कनेक्शन कापल्यानंतर येत्या २५ सप्टेंबरपर्यंत सरकारी निवासस्थान रिकामे करण्याची घोषणा राष्ट्रीय लोकदलाचे नेते व माजी केंद्रीय मंत्री यांनी केली आहे.
गेल्या ३६ वर्षांपासून मी इथे राहात असून माझे वडील दिवंगत चौधरी चरणसिंह सर्वप्रथम १९७८ मध्ये या निवासस्थानात आले होते. निवासस्थान रिकामे करण्यापूर्वी अनेक गोष्टींची पूर्तता मला करायची आहे. गेल्या ११ ऑगस्टला मला नोटीस मिळाली होती आणि २४-२५ सप्टेंबरपर्यंत मी निवासस्थान रिकामे करीन. यामध्ये खूप अडचण आहे असे मला तरी वाटत नाही, असे अजितसिंह यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले. मला राजधानीत नवीन घर मिळाले आहे आणि यासंबंधीचा करारही झाला आहे. परंतु, सध्या पितृपक्ष असल्यामुळे मी तिथे जाऊ शकत नाही असे मी अधिकार्‍यांना गेल्या ९ तारखेला सांगितले होते. पितृपक्ष संपल्यानंतर मी नवीन घरात जाईन, असेही अजितसिंह यांनी सांगितले.

Post a Comment

 
Top