मंगळवेढा / तालुका प्रतिनिधी
शिवसेनेच्या युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे सोमवार दि. १३ ऑक्टोबर रोजी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ पंढरपूर शहरात रोड शो करणार आहेत. आदित्य ठाकरे यांच्या 'रोड शो'मुळे शिवसेनेला पंढरपूरात वातावरण निर्मिती करुन मताधिक्य मिळविण्यासाठी चांगला फायदा होणार आहे. समाधान आवताडे यांनी मंगळवेढय़ातील पाठिंबा मोठय़ा प्रमाणात मिळवत पंढरपूरमध्ये देखील लक्षणीय यश मिळविले आहे. चौफाळा चौकात दहिहंडीचा कार्यक्रम करुन पंढरपूरवासीयांची मने जिंकली. पंढरपूरमध्ये अर्ज दाखल करताना जोरदार शक्तीप्रदर्शन केले. पडत्या पावसात रामदास कदम यांच्या सभेला प्रतिसाद मिळाला. आता खुद्द युवा नेते आदित्य ठाकरे रोड शो करणार असल्यामुळे समाधान आवताडे यांचा आलेख वाढत चालला असून प्रचारात त्यांनी घेतलेली भरारी उल्लेखनीय ठरू लागली आहे. पंढरपूरातील शिवसेनेचे नेते कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, आवताडेंचे अनुयायी यामुळे पंढरपूरात आवताडे यांना पोषक वातावरण झाले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment