मंगळवेढा / प्रतिनिधी
तालुक्यातील घरनिकी येथील माण नदीच्या पत्रातील वाळू चोरी प्रकरणी एकूण ६ जणांना अटक करून वाळूसह १२ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. दरम्यान मंगळवेढा न्यायालयात उभे केले असता त्यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, दि. २८ ऑक्टोबर रोजी रात्री ११.३0 वाजता घरनिकी येथील माण नदीच्या पात्रातून एम.एच.२५/बी. ३८८६, एम.एच. १३/ए.जे. ६१३५ व विना नंबरचा एक असे तीन ट्रॅक्टर वाळू भरून मंगळवेढा शहराकडे येत होते. या दरम्यान पोलीस निरीक्षक दिलीप पाटील यांच्यासह शहर बीटचे पोलीस हवालदार दत्तात्रय तोंडले हे गस्त घालत असताना हे ट्रॅक्टर सापडले. याबाबत अधिक चौकशी केली असता ही वाळू माण नदीच्या पत्रातून चोरुन आणण्याचे निष्पन्न झाले. वाळूसह सदर वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. अधिक तपास हवालदार तोंडले हे करीत आहेत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment