0

टेंभुर्णी / प्रतिनिधी
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दुग्धजन्य पदार्थांची मोठय़ा प्रमाणात दराची घसरण झाल्याने १ नोव्हेंबरपासून गायीच्या दुधाच्या दरात दोन रुपयांनी कपात करण्यात येणार असल्याची माहिती सोनाई दुध संघाचे अध्यक्ष दशरथ माने यांनी दिली. दराच्या सदरच्या घसरणीमुळे दुध उत्पादक शेतकरी अडचणीत येणार आहे. मागील वर्षी दुग्धजन्य पदार्थांची निर्यात चालू असल्याने चांगला दर मिळत होते. पर्यायाने दुधाला चांगला दर देणे सोपे होते. मात्र गेला महिन्यापासून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दुग्धजन्य पदार्थांच्या दरात कमालीची घसरण चालू झाली आहे. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसापूर्वीच दुधाच्या दरात एक रुपयांनी कपात करण्यात आली होती. मात्र दराची घसरण चालूच राहिल्याने आता १ नोव्हेंबरपासून पुन्हा दोन रुपयांनी दुध खरेदी दरात कपात करावी लागत आहे. घसरणीच्या दरामुळे दुध पावडरची निर्यात थांबली आहे. याचा तोटा डेअरी उत्पादकांना सहन करावा लागत आहे. आणखी दराची घसरण चालू राहिल्यास पुन्हा दुध खरेदी दरात आणखी कपात करण्याची वेळ येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.      

Post a Comment

 
Top