नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं निमंत्रण अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी स्वीकारलं आहे. ओबामा हे 26 जानेवारी रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक सोहळ्याला उपस्थित राहाणार आहेत. भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना निमंत्रित करण्यात आलं. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर याबाबतची माहिती दिली. ओबामांनीही तत्परतेने निमंत्रण स्वीकारलं आहे. 26 जानेवारी रोजीच्या परेडसाठी अमेरिकेच्या अध्यक्षांना आमंत्रित करण्याची ही पहिलीच वेळ आहे. मोदी यांनी पंतप्रधानांची सूत्र हाती घेतल्यानंतर प्रथमच ओबामा भारतात येतील. सप्टेंबरमध्ये नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर गेले होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment