0


औरंगाबाद : राज्यात कुणाची सत्ता आहे, हे अजूनही मला समजलेले नाही, तुम्हाला समजलं तर नक्की मला ही सांगा, असं राज ठाकरे यांनी औरंगाबादेत पत्रकारांशी बोलतांना म्हटलं आहे. तसेच माझ्या दौऱ्याला गर्दी नाही, कारण मी कुणालाही न येण्यास सांगितलं आहे. उगाच सामान्यांना त्रास नको या मागचा हा उद्देश असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. राज ठाकरे काल औरंगाबादेत दाखल झाले आहेत, या काल आणि आज राज यांनी कार्यकर्त्यांच्या भेटी घेणे सुरू ठेवलं आहे, काल राज ठाकरे हे औरंगाबादेत आले, तेव्हा त्यांच्या स्वागताला गर्दी फारच कमी असल्याने, राज ठाकरे यांचं कार्यकर्त्यांमधील ग्लॅमर कमी होतंय का? असा प्रश्न समोर आला होता. राज ठाकरे औरंगाबादला यायचे तेव्हा मोठ्या प्रमाणात तरूणांची गर्दी दिसून येत होती, मात्र यावेळी आपणच कुणालाही न येण्यास सांगितल्याने गर्दी दिसणार नसल्याचं राज यांनी म्हटलंय.

Post a Comment

 
Top