0

लक्ष्मी दहिवडी / प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्यातील आंधळगावच्या एका शेतकर्‍याने कृषी विभागाच्या योजनेतून शेडनेट हाऊस उभा करुन त्यामध्ये ढब्बू मिरचीची लागण केली आहे. २0 गुंठय़ात उभारलेल्या या शेड नेटहाऊसमध्ये त्यांनी सव्वा महिन्यात सात टन मिरची उत्पादन काढले आहे. त्यांची यशोगाथा बुधवारी 'पुण्य नगरी'च्या कृषी नगरी सदरात वीस गुंठय़ात सात टन मिरचीचे उत्पादन या मथळ्याखाली मांडली होती. ती यशोगाथा वाचून जिल्हा कृषी अधीक्षक रफीक नाईकवाडी यांनी त्या शेडनेट हाऊसला भेट दिली. आबासाहेब माळी यांनी आंधळगाव माळरानावर राष्ट्रीय फलोत्पादन योजनेतून शेडनेट हाऊस उभा करुन ढब्बू मिरचीची लागवड केली आहे. सव्वा महिन्यात मिरची उत्पादन सुरु झाले व सव्वा महिन्यात ७ टन उत्पादन निघाले असून शेवटपर्यंत ४0 टन उत्पन्न अपेक्षित आहे. त्या शेडनेटला भेट देऊन 'पुण्य नगरी'ने त्यांची यशोगथा बुधवारच्या सदरात मांडल्यानंतर जिल्हा कृषी अधिकार्‍यांनी त्या ढब्बू मिरचीचचे शेडनेट हाऊस पाहण्यासाठी त्याच दिवशी सकाळी आंधळगावात येऊन माळींच्या शेडनेट हाऊसची पाहणी केली. त्यांच्यासोबत तालुका कृषी अधिकारी गजानन ताटे, मंडल अधिकारी आशेक कांबळे हेही होते. पाहणी केल्यानंतर या अधिकार्‍यांनी आबासाहेब माळी यांच्या कष्टाचे कौतुक करुन सर्व शेतकर्‍यांपर्यंत अशा योजना शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले.

Post a Comment

 
Top