शेफिल्ड शिल्ड सामन्यात उसळता चेंडू डोक्यावर आदळल्यामुळे
गंभीर जखमी झालेला ऑस्ट्रेलियन फलंदाज फिल
ह्युजेसची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर बुधवारी अपेशी ठरली.
मंगळवारी सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर शेफिल्ड शिल्ड सामन्यात
उसळता चेंडू डोक्यावर आदळल्यामुळे गंभीर
जखमी झालेल्या ह्युजेसची प्रकृती अद्याप चिंताजनक होती.
मायकेल क्लार्क दुखापतीमुळे पहिल्या कसोटीत खेळू शकणार
नसल्यामुळे २५ वर्षीय
ह्युजेसला कसोटी पुनरागमनाची संधी मिळणार होती, परंतु
मंगळवारी सीन एबॉटचा चेंडू
डोक्याला खालच्या बाजूला लागल्यामुळे त्याच्यावर तातडीने
शस्त्रक्रिया करण्यात आली. सेंट व्हिन्सेंट इस्पितळातील
अतिदक्षता विभागात त्याला ठेवण्यात आले होते.
न्यू साऊथ वेल्स आणि साऊथ ऑस्ट्रेलिया यांच्यातील
सामन्यादरम्यान ह्युजेसला ही जिवावर बेतणारी दुखापत झाली.
त्यानंतर हा सामना पुढे सुरू झाला नव्हता. या घटनेचा आदर करून
शेफिल्ड शिल्डमधील चालू फेरीचे सर्व सामने रद्द करण्यात आले
होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment