0

आदरणीय ???? बीजेपी,

अत्यंत खेदपुर्वकपणे आपणास विनंती आहे की जे मत मी आपल्याला दिले होते, ते कृपया मला परत करावे. आपणास मत देण्याची दुर्बुद्धि झाली कारण मी आपण टाकलेल्या मायाजाळात फसलो गेलो. आपण माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला जी स्वप्ने दाखविली, उदा. : राष्ट्रवादीचे भ्रष्टाचार बाहेर काढू, भ्रष्टाचार्यांना जेलमधे घालू, सिंचन घोटाळ्यासारखे मोठमोठे घोटाळे उघडकीस आणून दोषी नेत्यांना शिक्षा देवू ई. ई. त्यामुळे आम्हा पामरांना आपल्या रुपात साक्षात देवदुतच आमच्या कल्याणासाठी अवतरले की काय असे वाटू लागले. कधी एकदा मतदानाचा दिवस येतो आणि कमळपुढचे बटन दाबतो असे झाले होते. निकालानंतर आपणास बहुमत मिळाले नाही हे पाहून दुखः झाले, परन्तु राष्ट्रवादीच्या लुभरेपणाकडे लक्ष न देता आपण आपल्या नैसर्गिक मित्राबरोबर सत्ता स्थापन करून आपली आश्वासने पूर्ण करालच अशी भाबडी आशा होती. पण आज राष्ट्रवादीच्या मदतीने सरकार स्थापन करून आपण माझ्या पाठीत खंजिर खुपसला आहे. माझा विश्वासघात केला केला आहे. म्हणून मी आपल्याला दिलेले माझे मत मला परत करावे ही नम्र विनंती.

- आपल्याकडून मुर्ख बनविला गेलेला एक मतदार -

                  अमोल फुलारी 
                    86986 21414

Post a Comment

 
Top