0


पुणे /बसवेश्वर बेडगे दि.16
     वेगळया नजरेनं पाहिलं तर वेगळंच दिसतं. दोन्ही बाजूंनी टीकाच होते, तर वागायचं कसं? भाजप - राष्ट्रवादीच्या वाढत्या जवळकीकेबाबत होत असलेल्या टीकेवर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी ही बोलकी प्रतिक्रिया दिली आहे.     सरकारने बहुमत, आकडेवारीवर सिद्‍ध करायला हवं होतं. असे म्हणत अजितदादांनी सरकारवरही टीका केली आहे. बहुमत सिद्‍ध करताना गोंधळाचे वातावरण होते. कोणाच्‍या बाजुला किती मतं हे स्‍पष्‍ट व्‍हायला हवं होतं अस मतही त्यांनी मांडले आहे.   मराठा आरक्षणाच्या बैठकीला खराब हवामानामुळे पोहोचू शकलो नसल्याचा खुलासा त्यांनी केला. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडताना, राज्य सरकारने चांगला वकील देण्याची मागणीही अजित पवारांनी केली आहे.
--------------------------------
-------------------------------------

Post a Comment

 
Top