सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचे निर्दालन करण्याचे हे व्रत सर्वांनी पाळलेच पाहिजे. पोलीस दलाच्या बोधचिन्हात असलेला तळहाताचा पंजा सामान्य जनतेला अभय देणारा आहे. त्याचबरोबर समाजकंटकांवर कठोर कारवाई करणारा देखील आहे. पोलिसांनी दैनंदिन काम करताना ही जाणीव ठेवली आहे. परंतु, अपुर्या मनुष्यबळामुळे मंगळवेढा पोलिसांच्या कामाचा गाडा हळूहळू चालताना दिसत आहे. मंगळवेढा तालुका पोलीस स्टेशनचा कारभार फक्त ३४ पोलीस कर्मचार्यांवर चालत असल्यामुळे पोलीस कर्मचार्यांना ऑनड्युटी २४ तास काम करावे लागत असल्यामुळे येथील पोलीस कर्मचारी मोठय़ा मानसिक तणावाखाली काम करत आहेत. तालुक्यात ८१ गावे आहेत. मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात सुमारे २ लाखाच्या आसपास लोकसंख्या आहे. परंतु, तालुक्यातील दोन लाख लोकांच्या सुरक्षेची जबाबदारी केवळ ३४ पोलीस कर्मचार्यांच्या खांद्यावर आहे. त्यामध्ये ५ पोलीस कर्मचारी चालक आहेत. दररोज लागणारे कर्मचारी ठाणे अंमलदार २, मदतनीस २, वायरलेससाठी २, सबजेल गार्ड ४ दैनंदिन कामकाजासाठी यांचा वापर करण्यात येतो. तालुक्यात तीन औटपोस्ट असून बोराळे, हुलजंती येथे अद्यापही कोणत्याही पोलीस कर्मचार्यांची नेमणूक करण्यात आली नाही, तर नंदेश्वरमध्ये औटपोस्ट कार्यरत आहे. त्यातच दोन पोलीस कर्मचार्यांची नेमणूक मंगळवेढा पोलीस स्टेशनमध्ये असून ते संलग्न दुसर्या पोलीस स्टेशनशी आहेत. मंगळवेढा पोलीस स्टेशनसाठी एकूण ६१ पोलीस कर्मचार्यांची नेमणूक आहे. त्यात दैनंदिन कामकाजाचे कर्मचारी सोडता सद्यस्थितीला १५ ते १६ पोलीस कर्मचार्यांवर संपूर्ण तालुक्याच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. एकएक पोलीस कर्मचार्यांना जवळपास ५ जणांची कामे करावी लागत आहेत. गेल्या ३ महिन्यापासून पोलीस कर्मचार्यांना घरातील लोकांना भेटण्यासाठी सुट्टीसुद्धा मिळत नाही. पोलिसांची मानसिक परिस्थिती ही खूपच हलाखीची झाली आहे. त्यांची ड्युटी ही 'ना घर का ना घाट का' अशी झाली आहे. त्यामुळे आलेल्या तक्रारींचा निपटारा करणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे अनेक गुन्ह्यांचा तपास पोलीस कर्मचारी कमी असल्यामुळे अनेक दिवस लागत नाही. आरोपींना शोधून आणून अटक करण्यास खूप विलंब होत आहे. तसेच नवरात्र महोत्सव व नुकत्याच विधानसभा निवडणूक व पंढरपूर कार्तिकवारी अशा अनेक बंदोबस्तासाठी परगावी नेमणूक केली जाते. त्यामुळे अपुर्या असलेल्या या ३४ कर्मचार्यांमधून निम्मे पोलीस कर्मचारी इतर बंदोबस्तासाठी जात असल्यामुळे पोलीस कर्मचार्यांना पुन्हाही येथील पोलीस स्टेशनचे काम दुपटीने समोर येत असल्यामुळे त्यांचे या २४ तास ड्युटीमध्ये चांगलेच खच्चीकरण होत आहे. सध्या येथील पोलीस निरीक्षकांपासून ते पोलीस कर्मचारी यांची अवस्था धरलं तर चावतंय सोडलं तर पळतंय अशी झाली आहे.
सध्या पोलीस कर्मचारी अपुरे असले तरी वरिष्ठ अधिकार्यांनी याची दखल घेतली असून लवकरच मंगळवेढा पोलीस स्टेशनला महिला व पुरुष कर्मचारी मिळणार आहेत.
दिलीप पाटील, पोलीस निरीक्षक, मंगळवेढा.
Post a Comment