लक्ष्मीदहिवडी / प्रतिनिधी
आठवडाभरात खराब हवामाण व वारंवार पडणारा पाऊस यामुळे डाळिंब फळबागांवर तेल्या, कुजवा, डांबर्या डाग, थ्रिप्स या रोगांचा मोठय़ा प्रमाणात प्रादुर्भाव झाला असून अनेक बागा पूर्ण उद्ध्वस्त झाल्या आहेत. त्यामुळे शेतकरी आता शासनाकडून काही पॅकेज मिळते का? याकडे टक लावून बसला आहे. वारंवार हवामान बदलत असल्याने तालुक्यातील सुमारे ८0 टक्के बागा तेल्याने उद्ध्वस्त झाल्या आहेत. यासंबंधी काही शेतकरी दोन महिन्यापासून नुकसान झालेल्या बागांचे पंचनामे करा म्हणून कृषी विभागाचे उंबरठे झिजवत आहेत. मात्र, कृषी विभागावरून आदेश आल्याशिवाय आम्ही काहीही करू शकत नाही, म्हणून हात झटकत आहे. किमान शेतकर्यांच्या फळबागांना भेटी देऊन त्या नुकसानग्रस्त शेतकर्यांचे मनोधैर्य वाढविण्याचा प्रयत्नही होताना दिसत नाही.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment