0

घेरडी येथील शेतकर्‍यांचे तहसीलदारांकडे निवेदन सांगोला/प्रतिनिधी
घेरडी परिसरात झालेल्या अवकाळी वादळी पावसामुळे पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे तातडीने करावेत, अशी मागणी घेरडी येथील पांडुरंग बुरंगे यांनी तहसिलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. १0 दिवसापूर्वी घेरडी परिसरात वादळी वार्‍यासह अवकाळी पाऊसाने हजेरी लावली. त्यामुळे येथील शेतकरी पांडुरंग बुरंगे यांचे ४ एकर ज्वारीचे पिक पूर्णपणे पडले होते. इतर अनेक शेतकर्‍यांचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. यंदाच्या वर्षी ज्वारी पिकाचे चांगले उत्पादन होण्याची शक्यता होती. पिके ही जोमदारपणे आली होती. मात्र, अवकाळी पावसामुळे सर्व काही होत्याचे नव्हते झाले.

Post a Comment

 
Top