कोरमा(राजस्थान) : मोबाईलची बॅटरी डाऊन झाल्यानंतर मोबाईल चार्जिंगला लावून आपण सहज मोबाईलवर आपली कामं करत बसतो. पण, मोबाईल चार्जिंगला लावून त्याच्याशी खेळणं जीवावर बेतू शकतं. हो, चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट होऊन एका युवकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
राजस्थानमधील कोरमा जिल्ह्यात झालेल्या या घटनेत 24 वर्षीय तरुणाचा करुण अंत झाला आहे. नैनवा गावात राजूलाल गुर्जर नावाचा हा तरुण आपला मोबाईल चार्जिंगला लावून मित्रांशी गप्पा मारत होता. यावेळी अचानक मोबाईलचा ब्लास्ट झाला. मोबाईल बॅटरीचा या स्फोटात राजूचा मृत्यू झाला आहे.
शुक्रवारी घडलेल्या या प्रकारानंतर राजूचं शवविच्छेदन करण्यात आलं. तेव्हा डॉक्टरांनी देखील इलेक्ट्रीक शॉक आणि जळाल्यानं राजूचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट केलं आहे. राजूलाल चार्जिंगला लावलेल्या मोबाईलवर बोलत असताना मोबाईलचा स्फोट झाला. या घटनेत राजूलालच्या छातीसह हाताला गंभीर जखमा झाल्या.
त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केलं. नैनवा हेल्थ सेंटरचे प्रमुख डॉ. समंदरलाल मीना यांच्या सांगण्यानुसार मोबाईल बॅटरी ब्लास्टमुळे मयत राजूच्या छाती आणि हातावर गंभीर जखमा झाल्या होत्या. पीएमनंतर इलेक्ट्रिक शॉक आणि जळाल्यानं राजूचा मृत्यू झाल्याचं रुग्णालयानं स्पष्ट केलं आहे. मोबाईल ब्लॉस्टमुळे राजू मृत्यू झाल्यानंतर त्याच्या नातेवाईकांना मोबाईल कंपनी विरोधात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
त्यामुळं बॅटरी डाऊन असलेला आपला मोबाईल चार्जिंगला लावून गप्पा किंवा चॅटिंग करणं जीवावर बेतू शकतं हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. त्यामुळं आपला जीव वाचवण्यासाठी तरी किमान चार्जिंग सुरु असताना मोबाईला यूझ करणं टाळलंच पाहिजे..
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment