माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि पंडित मदन मोहन मालवीय यांना आज (बुधवारी) देशातील सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ जाहीर झाला आहे.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी ट्विटरद्वारे यासंबंधी माहिती दिली. मालवीय यांना हा सन्मान मरणोत्तर प्रदान करण्यात येणार आहे.
उद्या म्हणजेच 25 डिसेंबरला यादोन्ही ज्येष्ठ नेत्यांचा वाढदिवस असल्याने त्यांना ‘भारतरत्न’ जाहीर करून केंद्र सरकारने त्यांना जन्मदिनी सर्वोच्च मोलाची भेट दिली आहे.गेल्या काही महिन्यांपासून वाजपेयी यांना ‘भारतरत्न’ देण्याविषयीची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.
2013 मध्येसचिन तेंडुलकर आणि शास्त्रज्ञ सीएनआर राव यांना ‘भारतरत्न’ दिल्यानंतर भाजपने यावर मोठ्या प्रमाणावर टीकाही केली होती. केंद्रात सत्तापालट झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली वाजपेयी यांना यंदा ‘भारतरत्न’ जाहीर होणार, हे जवळपास निश्चित झालं होतं. थोड्याच वेळापूर्वी घेण्यात आलेल्या कॅबिनेट बैठकीदरम्यान हा निर्णय घेण्यात आला.वाजपेयी यांचा उद्या, 25 डिसेंबर रोजी वाढदिवस असतो, त्यानिमित्ताने उद्या ‘सुशासन दिन’ साजरा केला जाणार आहे. आतापर्यंत देशातील 43 व्यक्तींना देशासाठी त्यांनी दिलेल्या योगदान तरत्न’ सन्मान प्रदान करण्यात आला आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment