0

नागपूर: शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधवांनी पोलीस अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावल्याची घटना पुढे आलीय. नागपूरात आमदार जाधवांनी शिवसेना पक्षप्रमुखांना भेटायला गेले असता हा प्रताप केल्याचं कळतंय. संबंधित पोलीस अधिकाऱ्यानं आमदार जाधव यांना उद्धव ठाकरेंना भेटू न दिल्यानं त्यांनी ही मारहाण केल्याचं समजतंय. उद्धव ठाकरे हे नागपुरात आहेत. त्यांची भेट घेण्यासाठी आमदार जाधव हे उद्धव ठाकरे ज्या हॉटेलमध्ये आहेत, तिथं गेले होते. मात्र याठिकाणी त्यांना पोलीस अधिकाऱ्यानं अडवल्यामुळं, जाधव यांनी थेट पोलिसाच्या कानशिलात लगावली. आमदार हर्षवर्धन जाधव हे औरंगाबादमधील कन्नड मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार आहेत. दरम्यान, झी मीडियाशी बोलतांना आपण असं काहीही केलं नसल्याचं आमदार हर्षवर्धन जाधवांनी म्हटलंय.

Post a Comment

 
Top