मंगळवेढा / प्रतिनिधी
तालुक्यातील ७७ पैकी २३ ग्रामपंचायतींच्या निवडणूका जाहीर झाल्या आहेत. विधानसभेच्या निवडणुकीनंतर प्रथमच आ. भारत भालके, परिचारक, आवताडे हे गट आमनेसामने येणार असून गावातील आपला गट प्रबळ ठेवण्यासाठी या सर्व गटांनी मोर्चे बांधणी सुरू केले आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मे ते डिसेंबर २0१५ या कालावधीत मुदत संपणार्या मंगळवेढा तालुक्यातील सार्वजनिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना व आरक्षणाचा कार्यक्रम घेण्यास सुरूवात झाले आहे. तालुक्यातील ७७ ग्रामपंचायतीपैकी २३ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या दृष्टीने प्रभाग रचनेचे काम चालु आहे. तालुक्यात या आगोदर पक्षाच्या नावाखाली व स्थानिक गावातील गटाप्रमाणे निवडणूक लढवण्यात येत होती. परंतु, २0१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत आ. भालके, परिचारक, आवताडे यांनी एकमेकांसमोर कठीण आव्हान ठेवले होते. दरम्यान, या अगोदर शेजारी असलेल्या पंढरपूर तालुक्यामध्ये आ. भालके-परिचारक गटांमध्ये काट्याची टक्कर पाहयला मिळत होती. हिच टक्कर आता मंगळवेढा तालुक्यात होणार असल्याने या निवडणुकीला चांगलाच रंग भरला आहे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून उभा असलेल्या समाधान आवताडे यांनी मंगळवेढा तालुक्यावर असलेले आवताडे गटाचे वर्चस्व कायम ठेवण्याचा प्रय▪केला तो यशस्वी झाला. या अगोदर तालुक्यात आ. भालके, आवताडे-परिचारक अशा गटातटावर निवडणूक लढली जात होती. परंतु, यावेळी ग्रामपंचायतीच्या निवडणूकीमध्ये आ. भालके, परिचारक, आवताडे या गटाच्या माध्यमातून निवडणूक होणार असल्याचे चित्र आहे.
प्रभाग रचनेचा कार्यक्रमया ग्रामपंचायतींच्या निवडणूकीचा प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रमामध्ये २0 जानेवारी २0१५ - प्रारुप प्रभाग रचनेला प्राधिकृत अधिकार्याकडून मान्यता देणे. २८ जानेवारी -सदस्यांची संख्या प्रभागात विभाजन करणे, जागा राखून ठेवणे, सोडत पद्धतीने प्रभागाचे आरक्षण ठरविणे, २९ जानेवारी रोजी हरकती व सूचना प्रसिद्ध करणे, ९ फेब्रुवारी हरकतीवर निर्णय घेण्याची अंतिम तारीख, १३ फेब्रुवारी अंतिम प्रभाग रचना आरक्षित जागा तपशिल प्रसिध्द करणे अशा पध्दतीने २३ ग्रामपंचायतीमधील एकूण २२१ पैकी पुरूष १0६ तर महिला सदस्या ११५ व एकूण वार्ड ७८ आहेत. अशा पध्दतीने निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.
Post a Comment